Minister Dattatray Bharne Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis : “मुख्यमंत्री देवाभाऊ All In One!” दत्तामामांनी दिली अनोखी पदवी

Agriculture Minister Dattatray Bharne praised CM Devendra Fadnavis as “All In One” during the 39th convocation ceremony of MPKV in Rahuri : राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39 वा पदवीदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कौतुक केलं.

Pradeep Pendhare

MPKV Rahuri Convocation : राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवीदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कौतुक करत, “All In One” आहेत, ही त्यांच्यासाठी माझ्याकडून पदवी आहे.

पण याच कार्यक्रमात फडणवीस यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठानं 'डॉक्टर ऑफ सायन्स', ही पदवी देत सन्मानित केलं.

राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवीदान समारंभ आज झाला. या समारंभात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून सन्मानित करण्यात आलं. राज्यपाल जिष्णु देव वर्मा, कृषीमंत्री दत्ता भरणे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांना आतापर्यंत तीन डाॅक्टरेट पदवी मिळाल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, एवढ्या मोठ्या, विद्यापीठाची एवढी मोठी, पदवी घेऊ की नये, अशा अवस्थेत होतो. पण, विद्यापीठाचा आग्रहाने हा मान स्वीकारल्याचे सांगितले. याचवेळी कृषीमंत्री भरणे (Dattatray Bharne) यांनी, मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक करताना, मुख्यमंत्री “All In One” आहे असे म्हणत, कौतुक केले अन् ही आपल्याकडून पदवी आहे, असे सांगितले.

कृषीमंत्री भरणे म्हणाले, "राज्याला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चांगले निर्णय घेत आहे. त्यांचे यासाठी अभिनंदन करतो." मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करत असताना, देवाभाऊ आपण “All In One” आहात. ही पदवी मी आपल्याला देतो. देवाभाऊविषयी सांगावं तेवढं थोडं आहे, असेही कृषीमंत्री भरणे यांनी म्हटले.

'कृषी क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रात त्यांची कामगिरी मोठी राहिली आहे. देवाभाऊ लाॅ-काॅलेजमध्ये असताना, त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं होतं. त्यांचा सत्कार झाला होता. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणणारा, देवाभाऊ काम करतो आहे. अशा देवाभाऊला विद्यापीठाकडून 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी मिळत असल्याचा आनंद होत आहे,' असे कृषीमंत्री भरणे यांनी म्हटले.

'विद्यार्थींचं कौतुक करताना, कृषीमंत्री भरणे विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त केला. सरकार, समाजाच्या, आईवडिलांच्या खूप अपेक्षा आहे. कृषी क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बना,' अशी अपेक्षा कृषीमंत्री भरणे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT