Tribal Students Discrimination : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भेदभाव! आमदार लहामटेंचा संताप; आता मुख्यमंत्री कारवाई करणार का?

Akole MLA Kiran Lahamate alleges discrimination against tribal students in reputed schools of Ahilyanagar and urges BJP CM Devendra Fadnavis to take action : अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यात नामांकित शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांबरोबर भेदभावाची वागणुकीच्या प्रकारावर आमदार किरण लहामटे आक्रमक झालेत.
MLA Kiran Lahamate
MLA Kiran LahamateSarkarnama
Published on
Updated on

Kiran Lahamate Complaint : शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात भेदभाव होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांबरोबर, हा प्रकार सुरू आहे. यावरून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडे थेट तक्रार केली आहे. यावर कारवाईची मागणी केली आहे.

'अकोले तालुक्यातील काही नामांकित शाळांमध्ये आदिवासी (Tribal) विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसविण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात असा भेदभाव होणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे,' यावरून आमदार डाॅ. लहामटे यांनी संताप व्यक्त केला आहे.

'समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्त्वावर उभ्या असलेल्या आपल्या लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांमध्ये जात, वर्ग किंवा सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर भिंती उभ्या राहणे योग्य नाही. त्यामुळे या नामांकित समजणाऱ्या शाळांना (School) आदिवासी विद्यार्थी देणे तातडीने थांबवावे,' अशी मागणी आमदार डॉ. लहामटे यांनी मुख्यमंत्री आणि आदिवासी विकासमंत्र्यांकडे केली आहे.

MLA Kiran Lahamate
Satyajeet Tambe On TET compulsion : ‘शिक्षकांवर प्रयोग थांबवा’; 'TET'विरोधात सत्यजीत तांबे यांचा विधिमंडळात घुमला आवाज

आमदार डाॅ. लहामटे म्हणाले, "शाळा केवळ ज्ञान देणाऱ्या संस्था नसून समाजात समता आणि संवेदनशीलता रुजविण्याचे केंद्र असतात. त्यामुळे शाळांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव दिसून येत असेल, तर त्यावर तत्काळ आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे."

MLA Kiran Lahamate
Maharashtra Budget Session : विधिमंडळात फुलांचा ‘ड्रामा’! भाजप आमदारांचा अनोखा, पण गंभीर मुद्दा! नेमका विषय काय?

प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी

'विद्यार्थ्यांना वेगळे बसविणे, त्यांच्याशी दुय्यम वागणूक देणे किंवा संस्थात्मक पातळीवर अन्यायकारक पद्धती राबविणे, हे शिक्षणाच्या मूलभूत तत्त्वांना विरोधी आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी,' अशी मागणी डाॅ. लहामटे यांनी केली.

सरकार व समाजाची सामूहिक जबाबदारी

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना समान संधी देणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविणे ही सरकारची व समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. शिक्षणात समतेची हमी आणि मानवी मूल्यांचे पालन हे केवळ कायद्याचेच नव्हे, तर समाजाच्या प्रगल्भतेचेही द्योतक आहे, असेही डाॅ. लहामटे यांनी म्हटले.

शिक्षक अन् प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचक इशारा

अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शिक्षण व्यवस्था अधिक संवेदनशील आणि जबाबदार होणे ही काळाची गरज आहे, तर आश्रमशाळेवर शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असून, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना याबाबत जबाबदार धरले जाईल, असाही इशारा आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com