CM Eknath Shinde Ayodhya Visit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वीच कार्यकर्त्यांमध्ये रेल्वेत राडा

CM Eknath Shinde Ayodhya Visit : रेल्वे प्रशासनाने शिवसेना नेते-कार्यकर्ते यांच्यात मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला.

सरकारनामा ब्यूरो

CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, आज (ता.८) संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री विमानाने आयोध्येसाठी रवाना होणार आहेत.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले आहे. मात्र मनमाड येथे शिवसेना नेते- कार्यकर्ते यांच्यात राडा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रेल्वे प्रशासनाने शिवसेना नेते-कार्यकर्ते यांच्यात मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला. या वादामुळे मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे तीन मिनिटे थांबली होती. काल (शुक्रवार) दुपारी नाशिक आणि ठाण्यातून दोन विशेष रेल्वेगाड्या अयोध्येसाठी रवाना झाल्या आहेत.त्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही आहेत.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नाशिकमधून घेऊन निघालेल्या रेल्वेत हा वाद झाला. बोगीत बसण्यावरून शिवसेना नेते-कार्यकर्त्यांमध्ये मोठा शाब्दीक वाद झाला. त्यामुळं मनमाड जँक्शनवर रेल्वे ३० मिनिटं थांबवावी लागली.रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वाद करणाऱ्यांना समजून सांगितल्यानंतर तणाव निवळला.

तीस मिनिटांनंतर रेल्वे पुन्हा अयोध्येच्या दिशेन निघाली. पण रेल्वे काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा हा वाद सुरु झाला. दोन वेळा चैन खेचून रेल्वे थांबविण्यात आली. पोलिसांनी नेते-कार्यकर्त्यांने मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला.

रविवारपासून मुख्यमंत्री दोन दिवसाच्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ते राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. हनुमान गढी दर्शन पूजन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणार आहेत.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT