Karnataka Elections 2023 : भाजपचा प्रचार करणाऱ्या अभिनेत्याच्या विरोधात JDS आक्रमक ; निवडणूक आयोगाला..

JDS demanding ban on Kichcha Sudeep Films : सध्या जेडीएसच्या निशाणावर सुदीप आहेत.
Kichcha Sudeep
Kichcha SudeepSarkarnama
Published on
Updated on

JDS writes to Election Commission demanding ban on Kichcha Sudeep Films : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) किच्चा सुदीप भाजप व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा प्रचार करीत आहेत.

सुदीप भाजपमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवणार की नाही देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही.किच्चा सुदीप याच्या भाजप प्रचारावरुन जेडीएस आक्रमक झाली आहे. सध्या जेडीएसच्या निशाणावर सुदीप आहेत.

जनता दल एलचे (JDS) प्रमुख आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुदीप यांच्याविरोधात तक्रार केली आहे. किच्चा सुदीप यांच्या चित्रपट, कार्यक्रम, जाहीरातीवर निवडणुक संपेपर्यंत बंदी घालावी, अशी मागणी कुमारस्वामी यांनी केली आहे.

Kichcha Sudeep
Kiran Kumar Reddy News: भाजपमध्ये प्रवेश करताच माजी मुख्यमंत्र्यांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली..; म्हणाले, '"माझा राजा बुद्धीमान..

जेडीएसचे नेता तनवीर अहमद म्हणाले, "किच्चा सुदीप हे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत आहेत. भाजपच्या लेटरहेडवरुन माध्यमांना निमंत्रण देत आहेत. ते आता राजकारणात आले असल्याने त्यांच्या चित्रपट, जाहीरातीवर बंदी घालावी,"

गेल्या काही दिवसांपूर्वी किच्चा सुदीप 31 गायी दत्तक घेतल्यामुळे चर्चेत आला होता. पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा 31 गायी त्याने दत्तक घेतल्या आहेत. कर्नाटकचे पशूसंवर्धन मंत्री प्रभू बी चौहान यांच्या निवासस्थानी किच्चाने गायीची पूजा केली होती. तसेच गायींच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या कामाचं त्याने कौतुक केलं.

Kichcha Sudeep
Kiran Kumar Reddy : काँग्रेसला मोठा झटका ; माजी मुख्यमंत्री रेड्डी यांचा भाजपमध्ये प्रवेश

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, जेडीएस आणि आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारीची यादी जाहीर केल्यानंतर आता भाजप उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार याची सगळ्यानाच उत्सुकता आहे.

राज्यातील सत्ताधारी भाजपने अद्याप आपले पत्ते उडलेले नाहीत. उमेदवारी यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली असून त्यावर विचारविनिमय सुरु आहे. भाजप दोन दिवसात म्हणजे ९ एप्रिल रोजी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

Kichcha Sudeep
Karnataka Assembly Election : भाजप उमेदवारीचे पत्ते खुले करणार ; प्रत्येक विधानसभेसाठी तीन नावांची शॉर्टलिस्ट..

इच्छुक उमेदवारांच्या नावावर नऊ एप्रिल रोजी अंतिम चर्चा होणार आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महासचिव बीएल संतोष, केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

कर्नाटक (Karnataka) विधानसभेसाठी भाजपच्या कोअर ग्रुपने प्रत्येक विधानसभेसाठी तीन नावांची निवड केली आहे. ही तीन नावे केंद्रीय निवडणूक समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत. या नावातून एक नाव निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com