MLA Saroj Ahire with CM Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde News; `राष्ट्रवादी`ने `या`साठी केले मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक

आमदार सरोज अहिरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून विधीमंडळात सुरु केला हिरकणी कक्ष

Sampat Devgire

नाशिक : देवळालीच्या (Nashik) आमदार सरोजताई अहिरे (Saroj Ahire) या यंदाच्या नागपूरच्या (Nagpur) हिवाळी अधिवेशनात आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह सहभागी झाल्या आहे. अधिवेशनाच्या पहिल्या विधीमंडळ आवारात त्यांचे बाळासह छायाचित्र चर्चेचा विषय ठरले होते. (NCP MLA Saroj Ahire attend assembly session with her newly born Child)

आमदार अहिरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह विविध नेत्यांनी भेट घेऊन या बाळ-बाळंतिनीचे कौतुक केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी भेट झाल्यावर विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीत हिरकणी कक्ष सुरु करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याची लगेचच कार्यवाही झाली. हिरकणी कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार सौ. सरोज अहिरे यांचे कर्तृत्व आणि मातृत्वाच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी या कक्षाची स्थापना करण्याचे निर्देश दिले. विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांनी त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

यासंदर्भात एक माता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रेरणा बलकवडे म्हणाल्या, आज सरोजताईंसारख्या व माझ्यासारख्या लाखो माता या महाराष्ट्रात जेव्हा घराबाहेर आपल्या लेकरासोबत पडतात तर त्या लेकराला दुध पाजण्यासाठी आम्हाला गर्दीत आडोसा शोधावा लागतो. आमच्या बाळाला जेव्हा झोप येते तेव्हा घराबाहेर कुठला पळणा… कुठेचरी कपड्याची झोळी बांधायची आणि बाळाला निजवायचे.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातेला आज हिरकणी क़क्षाची गरज आहे. घराबाहेर ती जेव्हा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन काम करण्यासाठी बाहेर पडते तेव्हा तीच्या बाळाला पण स्वच्छ सुरक्षीत जागा मिळावी हा तिचा पण आधिकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब माझ्यासारख्या असंख्य मातांसाठी संपुर्ण महाराष्ट्रात हिरकणी कक्ष असावेत ही विनंती.

-अॅ़ड प्रेरणा बलकवडे, नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT