Pathholes & Manisha Khatri Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Potholes : फडणवीसांनी खडसावलं, आयुक्तांनी दणका दिला; नाशिकचे 36 अभियंते गोत्यात, 3 दिवसांत खुलासा द्यावा लागणार

Manisha Khatri Nashik Municipal Commissioner : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नाशिकमधील रस्त्यांची दखल घ्यावी लागली आहे. सहा जणांचा बळी गेल्यानंतर आता महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. 36 अभियंत्यांना नोटीसा धाडल्या आहेत.

Ganesh Sonawane

Nashik potholes news today: नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न सध्या राज्यभर चर्चेत आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत तब्बल ६ जणांचा बळी गेल्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दखल घ्यावी लागली.

फडणवीसांनी यासंदर्भात मुंबईत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कारणे सांगू नका, नागरिकांच्या समस्या सोडवा.. कोट्यावधी रुपये खर्च करुनही नाशिककरांचा रोष कमी होत नसेल तर आपण कुठे चुकतोय याचे आत्मपरिक्षण करा अशा शब्दांत फडणवीसांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. फडणवीसांनी कानपिचक्या दिल्याने शहरातील जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नाने अखेर महापालिका प्रशासनाला खडबडून जागे झाले आहे.

खड्ड्यांच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी कठोर भूमिका घेतली आहे. मनपा आयुक्तांनी शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह बांधकाम व पाणीपुरवठा विभागातील ९ कार्यकारी अभियंत्यांसह एकूण ३६ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

तीन दिवसांचा अल्टिमेटम

शहरातील अनेक रस्त्यांवर जीवघेणे खड्डे असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार सूचना देऊनही खड्डे बुजविण्याचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. या विलंबाची नेमकी कारणे काय आहेत याचा खुलासा तीन दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सादर करावा, असे निर्देश आयुक्त खत्री यांनी नोटिसीद्वारे दिले आहेत.

समाधानकारक खुलासा न केल्यास किंवा मुदतीत उत्तर न दिल्यास संबंधित अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊन गैरवर्तवणुकीचा स्पष्ट अहवाल थेट राज्य शासनाकडे पाठवून पुढील कारवाई केली जाणार आहे.

...या अभियंत्यांना नोटीस

बांधकाम विभागातील प्रशांत पगार, संदेश शिंदे, रवींद्र बागूल, रवींद्र पाटील, नवनीत भामरे, नरेंद्र शिंदे, संजय अडेसरा, विशाल गरुड या कार्यकारी अभियंत्यासह नीलेश साळी, नितीन राजपूत, हेमराज नांदुर्डीकर, भरत ठाकरे, बाळा गाजुल, प्रशांत बोरसे, ज्ञानेश्वर जगताप, भरत ठाकरे, दत्तात्रय शिंगाडे, सुरेश पाटील, दत्तात्रय कोल्हे, हेमंत पठे या उपअभियंत्यांसह कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांचाच विषय नाही. तर या खड्ड्यांमुळे शहराच्या विविध भागात जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. खड्डे बुजवताना झालेल्या दुर्लक्षामुळे आणि जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे जलवाहिन्या फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि त्यानंतर दुरुस्तीचे कामही वेळेत होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनाही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT