Nashik Crime : कायद्याच्या बालेकिल्ल्यात टवाळखोरांचा हैदोस, गाडीचा पाठलाग करत पुन्हा पर्यटकांवर हल्ला, तोडफोड ; 10 जणांविरोधात गुन्हा

Nashik Crime, Harihar Fort Tourist Attack : हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला अडवून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला होता. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Nashik
Nashik PoliceSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime : गेल्या महिन्यात भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्रकार आजही नाशिककर विसरलेले नाहीत. आजही तो प्रसंग आठवला की, पर्यटकांच्या अंगावर काटा येतो. अशातच पुन्हा एकदा तसाच पर्यटकांवरील हल्ल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला आहे.

नाशिकच्या हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला अडवून त्यांना मारहाण आणि दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 10 जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यटकांवरील हल्ल्याची सलग दुसरी घटना घडल्याने नाशिकच्या पर्यटन मार्गावर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक हरिहर किल्ल्यावरून वाहनाने परतत होते. याच दरम्यान मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर संबंधितांनी मोटारसायकलवरून पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. काही अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर वावी हर्ष परिसरात पर्यटकांची गाडी अडवण्यात आली. या हल्ल्यात चालक आणि प्रवाशांना काठी तसेच चापटीने मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत तक्रारीत नमूद आहे.

Nashik
Nashik Crime : स्क्रू ड्रायव्हरने उघडलं न्यायालयाचं गेट ; न्यायाधीशांच्या निवासस्थानाची रेकी करणाऱ्या दोघांना कठोर शिक्षा

केवळ मारहाणच नव्हे तर संशियतांनी वाहनावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. दगडफेकीमुळे गाडीच्या समोरील काचेचे आणि साईड मिररचे मोठे नुकसान झाले. तसेच वाहनाचे छत आणि बंपर देखील काठी आणि दगडांनी फोडल्याचे तक्रारीत नमूद आहे. हल्ल्यादरम्यान आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी कारवाई करत तासाभरात चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Nashik
Pune Crime : पुण्यात १ कोटींच्या दरोड्याचा प्लॅन, दोन पोलिसांनी तोतया पत्रकारासह आखला डाव; CCTV मुळे भांडाफोड!

नाशिकमधील इगतपुरी परिसरात असलेल्या भावली धरणावर १२ जुलै २०२६ रोजी पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर स्थानिक गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता. महिलेची छेड काढल्याचा जाब विचारल्यामुळे संशयित टोळक्याने गाडीचा १५ ते २० किलोमीटरपर्यंत पाठलाग करत तोडफोड केली व दहशत माजवली होती. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांसोबत देखील असाच प्रकार घडल्याने त्र्यंबकेश्वर-घोटी पर्यटन मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com