Dada Bhuse with Rikshaw owner
Dada Bhuse with Rikshaw owner Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde birthday News; लवकरच रिक्षाचालकांसाठी अच्छे दिन!

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) पक्षाचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिवसानिमित्त आज शहरात ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धा झाली. यानिमित्ताने रिक्षाचालकांचाही भाव वधारला होता. राज्यातील रिक्षाचालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लवकरच मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांनी यावेळी सांगितले. ( CM will take a Good decision for Rikshaw Drivers of the state)

बाळसाहेबांची शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी आयोजित केलेल्या ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धेत पंचवटीतील उमाकांत प्रभाळे यांच्या रिक्षाने प्रथम क्रमांकाचे २१ हजारांचे पारितोषिक पटकाविले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिवसानिमित्त हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात झालेल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण पालकमंत्री भुसे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महिला आघाडी जिल्हा संघटक लक्ष्मीताई ताठे, महिला आघाडी महानगरप्रमुख अश्विनीताई देशमाने, युवसेना महानगरप्रमुख दिगंबर नाडे यांच्या हस्ते झाले.

या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यातून ३३८ रिक्षा सहभागी झाल्या होत्या. नाशिक विभागातून उमाकांत प्रभाळे यांच्या रिक्षाला पहिले, द्वितीय बक्षिस प्रमोद कडजेकर, तृतीय सागर चौधरी, चौथे श्रीपाद जाधव आणि पाचवे बक्षिस सागर क्षत्रिय यांच्या रिक्षाला मिळाले. याशिवाय गोकुळ तांबडे, अनिल अष्टेकर, सुनील जोशी, चंद्रकांत पाटील, वसीम शेख, अजित गांगुर्डे यांच्या रिक्षांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. इम्तीयाझ शेख, हनिफ शेख (मुंबई), पश्चिम महाराष्ट्र विभागातून सुनील नाळे यांना प्रथम तर अविनाश दिंडे (कोल्हापूर) यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले.

अनेक रिक्षाचालक, मालक आपल्या रिक्षाची आकर्षक पद्धतीने सजावट करतात. नाशिककर रिक्षाचालकांच्या रिक्षांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT