NCP News: भुजबळांना 26 महिने तर विरोध करणाऱ्याला 30 महिने शिक्षा!

`ईडी`च्या कारवाई विरोधात नाशिक- पुणे महामार्गावर आंदोलन करणाऱ्या भुजबळ समर्थक गणेश गायधनी यांना अडीच वर्षांची शिक्षा सुनावली.
Chhagan Bhujbal & Ganesh Gaidhani
Chhagan Bhujbal & Ganesh GaidhaniSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशिक- पुणे (Nashik) महामार्गावर आंदोलन करीत बसवर दगडफेक केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तालुकाप्रमुख गणेश गायधनी (Ganesh Gaidhani) यांना न्यायालयाने (Court) अडीच वर्षे कारावासीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन वर्षापूर्वी हे आंदोलन करण्यात आले होते. (JMFC court given two and half years imprisonment for NCP followers)

Chhagan Bhujbal & Ganesh Gaidhani
NMC Election: ‘वंचित’चे ऐकल्यावर शिवसेनेने निवडणूक लढवावी की नाही?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर `ईडी`ने कारवाई केली होती. त्यांना अटक केल्याची प्रतिक्रीया उमटली होती. विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. पळसे (नाशिक) येथे झालेल्या आंदोलनात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे संबंधीत खटल्यात श्री. भुजबळ 26 महिने तुरुंगात होते, तर त्याला विरोध म्हणून आंदोलन करणाऱ्यांना 30 महिन्यांची शिक्षा झाली आहे.

Chhagan Bhujbal & Ganesh Gaidhani
Congress News: काँग्रेस डेंजर झोनमध्ये ; निष्ठावंत नेता का दुखावला जातो ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांना बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी ईडी ने 2016 मध्ये ताब्यात घेतले होते. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले होते. यासंदर्भात 17 मार्च 2016 या दिवशी नाशिक पुणे महामार्गावरील त्रिमूर्ती प्लाझा समोर गणेश गायधनी आणि बाळू पुंजा चौधरी (रा. पळसे) यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते.

यासंदर्भात त्यांच्या विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात एस. टी. बस चालक रवींद्र नारायण गारकर (रा. केळवड, नगर) यांच्या ताब्यातील बस (क्र एम. एच. 14 बीटी 4376) अडवून दगडफेक केली. काचा फोडल्या, तसेच वाहक निलेश श्रीहरी इंगळे यांचा शर्ट पकडून बसमधून खाली ओढून मारहाण केली. बस मधील प्रवाश्यांमध्ये जाऊन घोषणाबाजी करीत दहशत निर्माण केली, असा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस हवालदार शाम जाधव यांनी केला होता. या खटल्यात नाशिकरोडच्या जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एम. शिंदे यांनी संशयीताना दोषी ठरवीत अडीचवर्षे कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.

Chhagan Bhujbal & Ganesh Gaidhani
Cash For Ministership : मंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी : भाजप आमदारांबरोबरच कॅबिनेट मंत्र्यालाही फसविण्याचा प्रयत्न

राजकीय आंदोलनात पोलिस व कार्यकर्ते सामंजस्याने कार्यवाही करतात. यामध्ये प्रतिकात्मक आंदोलन केले जातात. त्यात आंदोलन झाल्यावर पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांना काही काळ ठेऊन नंतर त्यांना सोडून दिले जातात. मात्र भुजबळ समर्थकांच्या या आक्रमक आंदोलनात व तत्कालीन भाजप सरकारने केलेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com