Balasaheb Thorat 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : 'स्थानिक'च्या निवडणुकांना 'MVA' कशी समोरं जाणार; बाळासाहेब थोरात म्हणाले...

Balasaheb Thorat Reacts on Ahilyanagar-Sangamner Local Elections Congress Leader Statement : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महाविकास आघाडीतून लढवायच्या की, स्वतंत्र यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Congress updates : महायुती सरकार सर्वच पातळीवर कुचकामी ठरलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दिसेल. या निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्रित समोरे जाणार की, स्वतंत्र यावर लवकरच निर्णय होईल.

परिस्थिती पाहून निर्णय घेताना, वेळ वाया जाणार नाही, याची काळजी घेऊ, असे सांगून स्थानिकसाठी 'मविआ'ची तयारी सुरू असल्याचे संकेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिले.

राज्यात आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. या निवडणुका मविआ म्हणून एकत्र लढवायच्या की, स्वतंत्र याबाबत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मोठं विधान केलं.

अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस (Congress) पक्षाचा विस्तार, संघटन बांधणीसाठी पक्ष निरीक्षक तथा प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. थोरात म्हणाले, "काँग्रेस पक्षाचे संघटन वाढविले जाणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या परिणामानंतर काही कार्यकर्ते पक्षातून गेले असतील. पण काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. नवीन कार्यकर्ते तयार होतात. त्यामुळे संघटन थांबत नसते. पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन, त्यांच्याशी विचार-विनिमय करून पक्ष संघटनेच्या रिक्त जागा भरल्या जात असून राज्यात वेगवान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे".

बाळासाहेब थोरातांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. महायुती सरकार सर्वच पातळीवर जनतेचा भ्रमनिराश केला आहे. जनतेच्या मनात भ्रमनिराश निर्माण झालेली आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेत दरमहिन्याला 2100 रूपये देणे, अशा घोषणा केल्या. प्रत्यक्षात शेतकरी कर्ज माफी केली नाही. लाडक्या बहिणींना दीड हजार मिळणे अवघड झाले, झाल्याचे सांगितले. समाजातील निराधार व्यक्तींसाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच अर्थसहाय रखडले. अवकाळीची नुकसान भरपाई नाही. राज्यातील युतीचे सरकार हे गोरगरिबांसाठी कुचकामी ठरल्याची टीका थोरातांनी केली.

जम्मू-काश्मिरमधील पहलगाम इथं मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये निरापराध व्यक्तींचे प्राण जातात. ही दुर्दैवी घटना आहे. सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी याचे समाधानकारक उत्तर देणे जबाबदारीचे होते. परंतु, याचे समाधानकारक उत्तर दिले जात नाही. या हल्ल्यानंतर तेथील मुस्लिम बांधवांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांचे प्राण वाचविले. राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले हे देशातील एकात्मतेचे दर्शन घडवणारे आहे, याकडे थोरातांनी लक्ष वेधलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT