NMC Commissioner Ramesh Pawar News, Nashik Latest Marathi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आयुक्त रमेश पवार यांनी घेतला पोषण आहाराचा आस्वाद!

शहरातील शाळांत लक्ष्मीची पावले उमटवत विद्यार्थिनीचे स्वागत झाले.

Sampat Devgire

नाशिक : महापालिकेच्या (Nmc) शाळांमध्ये बुधवारी मोठ्या उत्साहात चिमुकल्यांचे स्वागत झाले. स्वतः महापालिका आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी काही शाळांना भेटी देऊन चिमुरड्यांच्या स्वागत कार्यक्रमात सहभागी होतानाच त्यांच्या पोषण आहाराची चव घेतली. महिन्यापूर्वीच महापालिका आयुक्तांनी शिक्षकांच्या याद्या घेऊन अचानक भेटी देणार असल्याचे जाहीर केलेले आहे.(NMC commissioner ramesh Pawar starts surprise visits)

बुधवारपासून नाशिक महापालिकेच्या शाळाही सुरु झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी ठिकठिकाणी विद्यार्थी- विद्यार्थिनीचे जल्लोषात स्वागत झाले. शाळेत प्रथमच प्रवेश करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या उपक्रमातून स्वागत झाले. सातपूर कॉलनीत शाळेत स्वतः आयुक्तांनी भेट दिली. तेथे मुलींचे शाळेत लक्ष्मीची पावले उमटवत स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची आयुक्तांनी चव घेतली. (Nashik Latest Marathi News)

महापालिकेच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि शिक्षकही उपस्थित होते. शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देत चिमुकल्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. महापालिका शाळा क्रमांक ५७ येथे उपायुक्त दिलीप मेणकर यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव, शाळापूर्व तयारी मेळावा आणि पाठ्यपुस्तके, लेखन साहित्याचे वाटप झाले.

विभागीय अधिकारी संजय आव्हाड, मुख्याध्यापक राजीव दातीर, मिलिंद पवार, अनिल म्हस्के, मनिषा बाहुले आदींसह पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते. महापालिकेच्या उपक्रमात सहभाग घेताना राजधानी मित्रमंडळातर्फे पिण्याच्या पाण्याची बाटली, वह्या, कंपास पेटी, तसेच शिक्षकांच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, रबर व इतर शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT