राज ठाकरेंना अडवणाऱ्या पहिलवान, साधूंनी आदित्य ठाकरेंचे दिमाखदार स्वागत केले!

युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचे हनुमान गढीत महंत ज्ञानदास यांनी तोंडभरून कौतुक केले.
Aditya Thackeray Ayodhya Visit News, Raj Thackeray News
Aditya Thackeray Ayodhya Visit News, Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

अयोध्या : अयोध्येतील खासदार ब्रीजभूषण यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यासाठी मोठी रॅली काढली. त्यात हनुमान गढीचे पहिलवान आघाडीवर होते. मात्र बुधवारी युवा सेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे याच पैलवान साधूंनी दिमाखदार स्वागत करीत आर्शीवाद दिले. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंवर राजकीय मात केली आहे. (Aditya Thackeray Checkmate Raj Thakrey through Ayodhya Tour)

Aditya Thackeray Ayodhya Visit News, Raj Thackeray News
`ओबीसी`ची कत्तल होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे गुरुवारी अयोध्येत आगमन झाले. मात्र त्यांच्या पोहोचण्याआधीच नाशिक, जळगाव तसेच विविध भागातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते नियोजनासाठी दाखल झाले होते. त्यांनी विविध कार्यक्रम केले. (Aditya Thackeray Ayodhya Visit News)

Aditya Thackeray Ayodhya Visit News, Raj Thackeray News
मी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणूनच बघतो!

अयोध्येतील मंदिराएव्हढेच महत्व हनुमान गढीला आहे. निर्वानी अखाड्याचे प्रमुख स्थान आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष महंत ज्ञानदास, त्यांचे उत्तराधिकारी महंत संजयदास, महंत धऱमदास, महंत गौरीशंकरदास, मुख्य पुजारी महंत हेमंतदास यांसह विविध साधू महंतांची पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी या सर्वांनी त्यांचे स्वागत केले. विशेषतः हनुमान गढीच्या आखाड्यातील पहिलवानांनी उत्साहाने त्या भाग घेत ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. महिन्यापूर्वी भाजपचे खासदार ब्रीजभूषण यांच्या नेतृत्वाखाली याच हजारो पहिलवानांनी वाहन रॅली काढून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना अयोध्येत यायचे असेल तर माफी मागा, असा इशारा दिला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना आपला दौरा स्थगित करावा लागला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा राजकीयदृष्ट्या मनसेवर मात करणारा ठरला आहे.

राज्याचे पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काल जूनला अयोध्या दौऱ्यावर होते. अयोध्या येथे राम मंदीर, हनुमान गढी, इस्कॉन टेम्पल, शरयु नदीची महाआरती आदी कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाले. सायंकाळी शरयू नदीच्या घाटावर शिवसैनिक व युवासैनिकांच्या उपस्थितीत भव्य आरतीत हजारो नागरिक देखील सहभागी झाले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, नाशिकचे संपर्कप्रमुक भाऊसाहेब चौधरी यांसह विविध नेते त्यांच्या समवेत होते.

जळगावचे संपर्क प्रमुख संजय सावंत, युवासेना विभागीय सचिव-अविष्कार भुसे, युवासेना सहसचिव विराज कावडीया, विस्तारक कुणाल दराडे, विस्तारक किशोर भोसले, नाशिकचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते आदी पदाधिकारी अयोध्येत दोन दिवस अगोदरच दाखल झाले होते.

मुंबई, पुण्याहून विमानाने अयोध्येला पोहोचले होते. ठाणे, मुंबई आदी जिल्ह्यातून सोमवारी रेल्वेगाड्या रवाना झाल्या. नाशिक रोड, निफाड, मनमाड, नांदगाव, मालेगाव येथील कार्यकर्ते त्या- त्या स्थानकावरून गाडीत बसले. कार्यकर्त्यांना प्रवासात पांढरे टी- शर्ट देण्यात आले होते. त्यावर प्रभू श्रीरामाचा फोटो होता. युवा सेना, शिवसेना असे लिहिलेल्या टी-शर्ट व भगवे फेटे, शाली अयोध्येत परिधान केलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी अयोध्येत दिवसभर त्याचीच चर्चा होती.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com