Collector Office Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shocking: अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे शेतकऱ्यांना लुबाडतात?

असंख्य त्रस्त शेतकऱ्यांचा पैसे मागितल्याचा आरोप केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार काढला.

Sampat Devgire

नाशिक : अपर जिल्हाधिकारी (Uppar collector) दत्तप्रसाद नडे (Dattaprasad Nade) यांनी आमची फाइल बंद करण्यासाठी आमच्या बाजूने केसचा निकाल लागावा यासाठी आमच्याकडे भरघोस पैशांची मागणी केली. जिल्हाधिकारीसाहेब, आम्ही साधारण शेतकरी असून, आमची जमीन विकून यांना पैसे देऊ की आत्महत्या करून? यापैकी कोणता निर्णय घेऊ, असा प्रश्न शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनाच पत्राद्वारे विचारला आहे. (Farmers complains Uppar collector deemands money for order)

दत्तात्रय आणि प्रभाकर पिंगळे (रा. रासेगाव, ता. दिंडोरी) अशी शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी शेतीला शेततळ्यामार्फत पाण्याची सोय करण्यासाठी खड्डे करीत त्यातून निघणारे गौणखनिज विकून त्या मोबदल्यात शेततळे व जमिनीची लेव्हल करून घेतली. त्याची रॉयल्टी भरलेली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात गट क्रमांक ३४५ मधून जे काही गौणखनिज निघेल ते सर्व सरकारी रस्त्याच्या कामाला वापरण्यात येईल व रॉयल्टी ठेकेदाराच्या बिलातून कपात करून शासनास जमा करण्यात येईल, असे कळविले. त्यानुसार ठेकेदाराने रॉयल्टी बिलातून कपात करून हे पैसे जमा केले.

बांधकाम विभाग व इतर सरकारी कामकाजाच्या पद्धतीनुसार कायदेशीर म्हणणे मांडून पुरावे दिले असताना अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडून या प्रकरणाची फाइल बंद करण्यासाठी तसेच आमच्या बाजूने निकाल लागावा यासाठी भरघोस पैशांची मागणी केली, त्यामुळे दोनच पर्याय शिल्लक असल्याचा संबंधित शेतकऱ्यांचा दावा आहे.

अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी जिल्ह्यातील २१ क्रशवर कारवाई करण्याच्या सूचना खनिकर्म विभागाला दिल्या आहेत. मात्र चार दिवस उलटहूनही यात विभागाकडून टाळाटाळ सुरू असल्याने आता या प्रकरणातही स्वतः जिल्हाधिकारी लक्ष घालणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाचे कामकाज सध्या चर्चेत आहे. श्री. नडे यांना क्रशर कामकाजात त्रुटी आढळल्यान सारुळ येथे १९, राजूर १ आणि पिंपळगाव १ याप्रमाणे २१ क्रशरवर कारवाई करण्याच्या सूचना दीड महिन्यापूर्वी खनिकर्म विभागाला दिल्या आहेत. अनेक प्रकारचे नियम धाब्यावर बसून क्रशर सुरु असल्याचे लक्षात आल्यावर श्री. नडे यांनी संबधित क्रशरची पाहणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते.

गौण खनिज क्रशरवरील कारवाईबाबत काही क्रशरला नोटीसा दिल्या आहेत मात्र, अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. सिन्नरला वन विभागाच्या जागेत डोंगर पोखरल्याच्या प्रकाराशिवाय इतर कुठला विषय अद्याप माझ्यापर्यत आलेला नाही. मात्र याप्रकरणी लक्ष घातले जाईल.

- गंगाथरण डी, जिल्हाधिकारी, नाशिक.

---

शेतकऱ्यांचे ठेकेदारामार्फत रस्त्याच्या कामाचे प्रकरण आहे. यात तहसीलदारांनी संबंधिताला दंड केला आहे आणि तहसीलदारांनी केलेला दंड प्रांताधिकाऱ्यांनी कायम केला आहे. यात माझ्याविषयी तक्रार कशी याचे मलाच आश्चर्य वाटते.

-दत्तप्रसाद नडे, अपर जिल्हाधिकारी, नाशिक

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT