Eknath Shinde: खासदार हेमंत गोडसेंचा शिवसेनेला धक्का

माजी आमदारांसह शिवसेनेचे १५ सरपंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात दाखल झाले.
Eknath Shinde welcomes Shivsena workers.
Eknath Shinde welcomes Shivsena workers.Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महिनाअखेरीस नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार पांडुरंग गांगड, (Pandurang Gangad) उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर यांच्यासह काही सरपंचांनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला. खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या पुढाकाराने झालेल्या या प्रवेशाने इगतपुरी तालुक्यात शिवसेनेला धक्का बसला. (Shivsena`s various workers & Sarpansh joins Shivsena)

Eknath Shinde welcomes Shivsena workers.
BJP News: अनेक बडे नेते रात्रीतून भाजपमध्‍ये दिसतील

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात बहुतांश शिवसेनेचे पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनीष्ठ आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची कास धरलेल्या खासदार हेमंत गोडसे यांनी हा प्रवेश घडवून इगतपुरी तालुक्यात शिवसेनेला हादरा देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेतील बहुतांश नेते व पदाधिकारी श्री. गोडसे यांच्यापासून अंतर ठेऊन आहेत. त्यामुळे आपला प्रभाव दाखविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. याच हेतूने त्यांनी हा प्रवेश घडवला.

Eknath Shinde welcomes Shivsena workers.
Nashik News: नाशिक झाले यूपी- बिहार, पोलिसांचा वचक संपला?

बुधवारी जुन्या शिवसैनिकांचा एक गट शिंदे गटात सहभागी झाला. श्री. गांगड, श्री. भोर तसेच माजी नगरसेवक मामा ठाकरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संपत काळे आदींसह अनेक जुन्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

यापूर्वीच माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. श्री. गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत बुधवारी पंचवटी विधानसभेचे माजी संपर्कप्रमुख दिलीप मोरे, शाखाप्रमुख अजित पवार, माजी उपशहरप्रमुख प्रकाश पवार, माजी शाखाप्रमुख सचिन थेटे, माजी उपविभागप्रमुख प्रमोद घोलप, अनिल पगारे यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांत जिल्हा परिषद कर्मचारी बँकेचे माजी अध्यक्ष विक्रम पिंगळे, देवळा शिवसेनेचे शहरप्रमुख देवा चव्हाण, शिवसेनेचे देवळा तालुका संघटक भाऊसाहेब चव्हाण, देवळा उपशहरप्रमुख सतीश आहेर, देवळा शहर संघटक नाजिम तांबोळी, देवळा उपशहरप्रमुख भाऊसाहेब आहेर, शिवसेना महिला आघाडीच्या कीर्ती निरगुडे, करुणा धामणे, राधिका मराठे, राष्ट्रवादीच्या कोमल साळवे, अलका नाडेकर, रेखाताई तपासे यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील सुमारे १५ सरपंचांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

जिल्हा संपर्कप्रमुख संजय बच्छाव, भाऊलाल तांबडे, लक्ष्मीबाई ताठे, सुजित जिरापुरे आदी उपस्थित होते. प्रवेश केलेल्या सर्वांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com