येवला : शहरात (City) नागरिकांशी (People) निगडित दैनंदिन (Daily issues of society) गरजा सुटत नसून (Not solve) विविध समस्या रखडल्या आहेत. या समस्या (Problems) सोडविण्यासाठी काँग्रेसतर्फे (Congress party) आज जागरण गोंधळ घालून (Agitation) गांधीगिरी (Gandhigiri) करत पालिकेचे लक्ष वेधण्यात आले.
शहराच्या विविध समस्यांबाबत पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शहर व तालुका काँग्रेसतर्फे देवी खुंट येथे जागरण गोंधळ करण्यात आले. शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, घाणीचे साम्राज्य, स्वच्छता, जंतूनाशक फवारणी, अशुद्ध व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, विंचूर चौफुली येथे सिग्नल बसवणे, अमरधाम येथे सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, शहरातील जुनी नगरपालिका येथे एक खिडकी योजना सुरू करणे, व्यापारी संकुलाचा प्रश्न सोडवणे, मोकाट जनावरांचा कायदेशीर व सरकारी नियमानुसार बंदोबस्त करणे, शहरातील बंद पथदीप सुरू करणे, घरपट्टी व पाणीपट्टी दर कमी करणे आदींसह मागण्यांसाठी जागरण गोंधळ करण्यात आले.
यावेळी हर्षल लाघवे, नितीन वंजारी, मोनिका वंजारी, रंगनाथ शेलार यांनी गोंधळ साजरा केला. त्यांनी गायलेल्या गाण्यांतून नागरिकांची चांगलीच करमणूक झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पालवे, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, जरार पैलवान शेख, अनिल पैलवान, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, नंदकुमार शिंदे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्याधिकारींची चर्चा
मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी देवीखुंटावर जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्व मुद्द्यांची दखल घेऊन शहरात काही कामे सुरू केली असून इतर कामेही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात निवडणुका असल्याने प्रशासन जनतेच्या समस्यांप्रश्नी दक्ष आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.