Congress Agitation In Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News: काँग्रेसचा ‘स्मार्टसिटी’ विरोधात एल्गार

‘स्मार्टसिटी चले जाव’ आंदोलनाने दुमदुमला शहरातील शालिमार परिसर

Sampat Devgire

नाशिक : शहर (Nashik) काँग्रेस (Congress) व व्यापारी वर्गातर्फे शालिमार चौकात स्मार्टसिटी (Smart City Project) विरोधात ‘चले जाव’चा नारा दिला. या वेळी स्मार्टसिटी विरोधात ‘स्मार्ट सिटी चले जाव’,‘स्मार्ट सिटी मुर्दाबाद’, ‘स्मार्ट सिटीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी (Inquiry of Smart city)झालीच पाहिजे’, ‘नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. (Ex. Corporator Rajendra Bagul deemands inquiry of Smart city project)

या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल यांनी स्मार्टसिटीच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले. ते मह्णाले, की शहरात स्मार्टसिटी कंपनीने नियोजनशून्य कारभार चालवला आहे. संपूर्ण शहरातील व गावठाणातील चांगले रस्ते खोदण्यात आले असून, हे शहर खड्ड्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध केले आहे. रस्ता खोदताना पाणी, वीज, गटार या सर्व वाहिन्या नादुरुस्त करून ठेवलेल्या आहेत. अनेक ठिकाणी नादुरुस्त वाहिन्या दुरुस्त न करता ते रस्ते तसेच बुजविण्यात आले. अनेक नागरिक अपघातग्रस्त झाले असून, काहींना अपंगत्व आले आहे. काही विजेच्या धक्क्याने व अपघाताने मृत्यूमुखी पडले एक प्रकारे स्मार्टसिटी कंपनीनेच हे घडविले आहे.

श्री. बागूल पुढे म्हणाले. कंपनीने किंवा महापालिकेने जबाबदारी तर सोडाच पण हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते आहे, असा आरोप करण्यात आला. सुंदर नाशिकचे विद्रूपीकरण स्मार्टसिटी कंपनीकडून अव्याहतपणे सुरू आहे. सदरच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, याची चौकशी मागणीच आंदोलनातून केली आहे. कामात गुणवत्ता व दर्जा नसून तसेच आराखड्यानुसार कोणतेही काम परिपूर्ण नाही याचीही चौकशी व्हावी, अशीही मागणी यानिमित्त करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी मनोगत व्यक्त करताना स्मार्टसिटीच्या कामाचे वाभाडे काढले.

या वेळी सुरेश मारू, डॉ. वसंत ठाकूर, ज्ञानेश्वर काळे, शरद बोडके, विजय पाटील, नरेश पारख, नरेश कटारिया, विश्वास काळे, ईसाक कुरेशी, रौफ कोकणी, अनिल बहोत, हनिफ बशीर, कैलास कडलग, बाबा खैरनार, साहिल खान, वसंत मणियार, अशोक शेंडगे, अल्ताफ सय्यद, राकेश चौधरी, बापू सूर्यवंशी, रईस शेख, सिद्धेश बागूल, शहानवाज आदींसह पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT