नाशिक : शिवसेनेचे माजी नगरसेवक व नाशिक म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे (NMC) अध्यक्ष प्रविण तिदमे (Pravin Tidme) यांनी शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केला. त्यामुळे त्यांची संघटनेच्या पदावरून हाकालपट्टी झाली. परंतु त्यांनी संघटनेवर ताबा मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्यांवर दबाव (Pressure) व बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याला कंटाळून या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा मार्ग स्विकारला. त्यामुळे यापुढे संघटनेच्या अध्यक्षपदावरून शिवसेना (Shivsena) व शिंदे गटात सुरू असलेली तानातानी वाढण्याची चिन्हे आहेत. (Shivsena & Shinde group`s politics will more sharp in Nashik)
दरम्यान संघटनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना थेट शिंदे गटात सहभागी होण्यासाठी बळजबरीपर्यंत आल्याने अखेरीस त्या सहा पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा मार्ग स्वीकारला. दरम्यान, संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या पाठिंब्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संघटनेचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांनी तिदमे यांच्याकडे महानगरप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. त्यानंतर म्युनिसिपल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदावरून संस्थापक अध्यक्ष बबन घोलप यांनी तिदमे यांची हकालपट्टी करत आधी स्वतःकडे व त्यानंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे संघटनेची सूत्रे दिली.
यादरम्यान तिदमे यांनी मीच संघटनेचा अध्यक्ष असल्याचा व संघटनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनीदेखील आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा केला. मात्र, संघटनेत राजकारण आल्याचा दावा करत संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र मोरे, जीवन लासुरे, नंदू खांडरे, सोमनाथ कासार, भूषण देशमुख, उत्तम बिडकर व किशोर कोठावदे यांनी संस्थापक अध्यक्ष घोलप यांच्याकडे पदाचे राजीनामे दिल्याचे समजते. दरम्यान, म्युनिसिपल कर्मचारी संघटना ही शिवसेनेचीच आहे व कर्मचारीदेखील याच संघटनेच्या अविभाज्य घटक असल्याने संघटनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २७) महापालिकेच्या रेकॉर्ड हॉलमध्ये कर्मचाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. यात कर्मचाऱ्यांच्या समस्या संदर्भात चर्चा होणार असली तरी यानिमित्त शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.