BJP Mahayuti government criticism : विधानसभेत झालेल्या मारहाणीप्रकरणावर काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप महायुतीवर टीका केली.
'गुंडांना अन् वाचाळवीरांना भाजपने मोकळीक दिली असून, महाराष्ट्रात जे घडतंय ते दुर्दैवी आहे', अशी टीका थोरात यांनी केली.
संगमनेरमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूर अक्कलकोट इथं झालेल्या शिवधर्म फाऊंडेशनने हल्ला करत, काळ फासलं. या हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर शहरात काँग्रेस (Congress), राजकीय पक्ष आणि पुरोगामी संघटनांनी आंदोलन केले. हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात गेला होता. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
विधानभवन मारहाणप्रकरणी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, "महाराष्ट्रात जे घडत आहे ते दुर्देवी आहे. हत्या, हल्ले यासारख्या अनेक घटना घडल्या आहेत. कालचा विधानभवनातील प्रकार दहशत निर्माण करण्याचा प्रकार होता. गुंडांना अन् वाचाळवीरांना भाजपने मोकळीक दिली आहे".
'जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे लाजीरवाणे आहे. आता तर गुंड थेट विधानभवनात येऊन मारहाण करत आहेत. अन्याय करणाऱ्याला सरंक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा, असं यांचं राज्यकारभार सुरू आहे. ही लोकशाहीची अधोगती आहे', असा टोला थोरात यांनी लगावला.
'धर्माचं नाव घेऊन राजकारण करण्याचा सोपा फंडा आहे. अनेक आश्वासन सरकारने दिली. लाडक्या बहिणींना 2100 देण्याऐवजी त्यांची संख्या कमी करण्यावर लक्षं ठेवलं आहे', असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील उभं राहण्यात भाजप महायुती सरकार हलगर्जीपणा करत आहे. आता जनतेने याबाबत आवाज उठवला पाहिजे, असेही आवाहन थोरात यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.