Balasaheb Thorat VS Vikhe Patil :  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics: विखेंच्या गडाला थोरात धक्के देणार?; काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीने चर्चेला उधाण

Balasaheb Thorat VS Vikhe Patil : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचाही मोठा प्लॅन; थोरात विखेंना भिडणार?

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवरच येत्या दोन जूनला मुंबईत प्रदेश काँग्रेसच्यावतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी नगर दक्षिण लोकसभा मतदासंघाचा आढावाही घेण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवरच माजी महसूल मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांची नगर शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी नगर दक्षिणेतून थोरातांनी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी करावी, अशी मागणी यावेळी काळे यांनी थोरातांकडे केली. तसे साकडेही शहरातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने थोरातांना घातले. कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दुसरीकडे नगर दक्षिण लोकसभेच्या जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची, असा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. यासाठी राष्ट्रवादीने तयारीही सुरू केली आहे. असे असतानाच महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसने आता या जागेवर दावा केला आहे.

यासाठी काँग्रेसच्या नगर शहरातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेत ही जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी केली आहे. तसेच येथून थोरातांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा काँग्रेसच्या कार्यर्त्यांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर २ जूनला मुंबईत होणाऱ्या काँग्रेसच्या आढावा बैठकीत हा मुद्दा मांडला जाणार आहे, असं किरण काळे यांनी सांगितलं.

तर भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील आगामी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चंग बांधला आहे. यातच आता काँग्रेसनेही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा काँग्रेसला सोडणार का? आणि तसं झालं तर थोरात ही निवडणूक लढवतील का? भविष्यात नगरच्या दक्षिणेत देखील उत्तरे प्रमाणे विखे विरूद्ध थोरात असा सामना रंगणार का? याची उत्सुकता आता नगरकरांना आहे.

दरम्यान, काळे म्हणाले की, "थोरात हे राज्यातील विधिमंडळातील ज्येष्ठ आमदार आहेत. राज्याच्या राजकारणात सुसंस्कृत आणि विकासात्मक व्हिजन असणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तुकाराम गडाख वगळता राष्ट्रवादीला या मतदारसंघात सातत्याने अपयश आलेले आहे.

विधानसभेच्या दक्षिणेतील सर्व जागा राष्ट्रवादी लढते आहे. दक्षिणेतील काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळायचा असेल तर दक्षिणेची लोकसभेची जागा काँग्रेसने लढवली पाहिजे", असं ते म्हणाले.

यावेळी कामगार नेते विलास उबाळे यांनी थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रतिलाल भंडारी यांची शहर जिल्हा काँग्रेसच्या सचिवपदी वर्णी लागली. थोरात यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र यावेळी प्रदान करण्यात आले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT