Ram Shinde Threatened: आमदार राम शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; व्हिडिओ व्हायरल, गुन्हा दाखल

Video Viral In Social Media : धमकी देणाऱ्या युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Ram Shinde News
Ram Shinde NewsSarkarnama

Ahmednagar News: भाजपचे आमदार राम शिंदे यांना एका युवकाने धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या धमकी प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड पोलिसांच्या माहितीनुसार, भाजपचे नेते राम शिंदे यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांना एका युवकाने धमकी दिली. याबद्दलची फिर्याद पालीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

त्यानंतर शिवीगाळ करणे, दोन गटात तेड निर्माण करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संबधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ram Shinde News
Shrigonda Politics : विधानसभेसाठी नागवडेंचं बंड; राष्ट्रवादीच्या शेलारांनीही थोपटलं दंड; म्हणाले...

दरम्यान, सागर गवसणे असं धमकी देणाऱ्या युवकाचं नाव असून या युवकाने सोशल मीडियावर लाईव्ह करत ही धमकी दिली. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, हा युवक एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com