Congress followers at Nashik
Congress followers at Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress News; व्यापारी पेठेत काँग्रेस कार्यकर्त्यांचे उत्साहात स्वागत

Sampat Devgire

नाशिक : भारत (India) हा विविधतेत एकता असलेला महान देश आहे. तेच त्याचे वैशिष्ठ्ये आहे. त्यामुळे सर्व घटकांमध्ये परस्पर सौहार्द (Harmony) असावे. हा संदेश घेऊन काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा (Bharat jodo Yatra) करीत आहेत. त्याचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरात (Nashik) हाथ से हाथ जोडो अभियान राबविण्यात आला. त्याला व्यापारी वर्गाचा प्रतिसाद मिळाला. (`Hath se Hath jodo` Campaign in nashik city by Congress)

भारताच्या प्रजासत्ताक दिनी सायंकाळी मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा पुढचा टप्पा म्हणून, शहरात हाथ से हाथ जोडो अभियान सुरू करण्यात आले. त्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.

पुढील दोन महिने हे अभियान शहरातील विविध भागात सुरू राहील. यामध्ये राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत, त्यांना कन्याकुमारी ते काश्मीर या तीन हजार मौलाच्या प्रवासात भेटलेल्या असंख्य भारतीयांच्या व्यथा, त्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांचे विचार, अडचणी, नागरी समस्या, केंद्रातील चुकलेले धोरण, धार्मिक, प्रांतिक, जातीय द्वेष निर्माण करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.

केंद्रातील सरकार आपली सत्ता अबाधीत ठेवण्याचे तंत्र म्हणून भेदभाव, भिती आणि नागरिकांत वाद-विवाद निर्माण करीत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. अशा विविध विषयांना स्पर्श करणारे राहुल गांधी यांचे एक पत्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान मध्य नाशिक ब्लॉकचे अध्यक्ष निलेश बबलू खैरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले.

याप्रसंगी बबलू खैरे, ज्ञानेश्वर काळे, हनिफ बशीर, गोपाळ जगताप, अण्णा मोरे, मनोहर अहिरे, मिलिंद हंडोरे, अमोल मारसाळे, इसाक कुरेशी यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT