Dada Bhuse News: शिंदे गटाची समिती शिवसेनेला आव्हान की भाजपवर दबावासाठी?

महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाने पालकमंत्री दादा भुसेंचा समावेष असलेली समिती जाहीर केली.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) निवडणुकांबाबत कोणतेही निश्चित धोरण नसलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने आता तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांचा समावेष असलेली समिती जाहीर केली आहे. ही समिती शिवसेनेला (Uddhav Thackrey) आव्हान देणार की भाजपवर (BJP) दबाव निर्माण करणार याची उत्सुकता आहे. (Eknath Shinde Group form a committee for NMC election)

Dada Bhuse
Chhagan Bhujbal News; सत्यजीत तांबेवर मतदारांनी किती विश्वास ठेवावा?

गेल्या काही निवडणुकांत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने कोणतीही राजकीय भूमिका न घेता भाजपला पुरक वर्तन ठेवले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शिंदे गट महापालिका निवडणुकांत काय धोरण ठेवणार याची उत्सुकता आहे.

Dada Bhuse
Nana Patole News; काँग्रेसची घाई; अस्तित्वात नसलेली कार्यकारणी बरखास्त?

महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे. त्यांचा सामना सत्ताधारी भाजपशी आहे. त्यात महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनाही फारसे स्थान निर्माण करता आलेले नव्हते. अशा स्थितीत शिंदे गटाने शिवसेनेच्या संघटनेला सतत सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्याकडे जेव्हढे पदाधिकारी आहेत, ते सर्व पूर्वाश्रमीचे शिवसेनेचेच आहेत.

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी भाऊसाहेब चौधरी (सचिव), पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रविण तिदमे आणि नाशिक लोकसभा सहसंपर्कप्रमुख राजु अण्णा लवटे यांचा समावेष असलेली समिती जाहीर केली आहे. ही समीती महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची बांधणी करणार आहे.

Dada Bhuse
Maharashtra Politics: पवारांविषयीच्या 'त्या' विधानावर आंबेडकरांचं घूमजाव; राऊतांच्या सल्ल्यालाही केराची टोपली

महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढत द्यायची असल्यास किमान 124 उमेदवारांची गरज आहे. एव्हढे उमेदवार शिंदे गटाकडे नाहीत. अशा स्थितीत ही समिती शिवसेनेच्या इच्छुकांना आमीष दाखवून फोडतोड करण्याचीच शक्यता अधिक आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटावर तसा दबाव निर्माण करण्यावर शिंदे गट भर देणार की मतविभागणी टाळण्यासाठी भाजपला युती करण्याचा दबाव निर्माण करण्याचे धोरण राबविणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दोन्ही स्थितीत महापालिकेतील सत्ताधारी भाजपला पालकमंत्री पदाची सत्ता व महापालिकेचे प्रशासन हाती असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे यांची डोकेदुखी वाढण्याचीच शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com