Congress Harshwardhan Sapkal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP controversial statement : मुंडे ते ठाकरे, हेडगेवार ते गोळवलकरपर्यंत सर्वांचेच नाव पुसायचेय; मोदी-शहांच्या कटकारस्थानात फडणवीसांचा हातभार

Congress Harshwardhan Sapkal Criticises BJP Ravindra Chavan Over Vilasrao Deshmukh Remark in Ahilyanagar : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar press conference : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसण्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

"मुंडेपासून ते ठाकरेपर्यंत आणि हेडगेवार ते गोळवलकर यांच्यापर्यंत सर्वांच्याच आठवणी मोदी आणि शहा यांना पुसायच्या आहेत. त्यांच्या या कटकारस्थानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातभार लावत आहे," असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

काँग्रेसचे (Congress) हर्षवर्धन सपकाळ आज अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रचार दौऱ्यावर होते. खासदार नीलेश लंके यांनी त्यांचे स्वागत केले. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "विलासरावांच्या आठवणी पुसून काढणे ही भाजप (BJP) आणि संघाची मूळ मानसिकता आहे. विलासराव यांच्या स्मृती नाही, पुसायच्या तर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या देखील आठवणी यांना पुसायचे आहेत. त्यांचे नाव त्यांना मागे टाकायचे आहे. त्यामुळे भाजपमध्ये त्यांच्या कन्येला कशी वागणूक दिली जात आहेत आपण ते पाहत आहोत. ज्या माणसांनी भाजप उभी केली ते प्रमोद महाजन, यांचे देखील नाव पुसून काढायचा आहे. त्यांच्या मुलीचे खासदारकीचे तिकीट कापणे हा त्यातीलच एक भाग होता."

ठाकरे अन् पवारांचे नाव पुसायचेय...

'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे देखील, नाव यांना पुसून काढायचे आहे. म्हणून एका शिवसेनेच्या दोन शिवसेना करण्याचा प्रकार भाजपने केला. मातोश्री असेल किंवा उद्धव ठाकरे असेल, यांच्या संदर्भात भाजपची भूमिका त्यांचे नाव पुसून काढण्यासाठीच आहे. देशाचे नेते महाराष्ट्राचे भूषण असलेले शरद पवार साहेब यांचे देखील कर्तृत्व त्यांना पुसून काढायचा आहे. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शकले केली,' असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

सपकाळ यांचा घणाघात

'महाराष्ट्रासह देशांमध्ये, भाजपला सर्वांचेच नाव पुसून काढायचे आहे. सभ्य आणि सुसंस्कृत म्हणून भाजपचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची ओळख आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर कोणतीही योजना नाही, त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी जयंती, पुण्यतिथीला भाजपकडून एकही जाहिरात दिली जात नाही. पर्यायाने अटलबिहारी वाजपेयी यांचेही नाव यांना पुसून काढायचे आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांचे राजकारण जिवंत ठेवलं. मोदी यांची आडवाणी यांनी वेळोवेळी पाठ राखण केली. त्यांचंही नाव यांना पसून काढायचा आहे, त्यांच्या परिवाराला दूर सारलं जात आहे. मुरली मनोहर जोशी यांचे देखील उदाहरण तसंच आहे,' असा घणाघात, हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

फडणवीसांवर गंभीर आरोप

'ही पुसून काढायची प्रवृत्ती ही संघाने वाढवलेली आहे, आता तीच प्रवृत्ती संघाच्या अंगलट येऊ लागली आहे. डॉ. हेडगेवार अन् गोळवलकर यांचे देखील नाव यांना पुसून काढायचे आहे. संघ मुख्यालयातील रेशीम बागेतील त्यांचे पुतळे, फोटो तिथून त्यांना काढायचे आहेत, तिथं मोदीजींना स्वतःचा आणि अमित शहांना, असे दोघांचेच फोटो इथं लावायचे आहेत. हे मोठं कट कारस्थान आहे. या कट कारस्थानाला महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढं नेत आहेत,' असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT