

Dharashiv And Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवनी आहे. तुळजापुरात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिला, आता मातेचा प्रसादा देण्याऐवजी येणाऱ्या भक्तांना ड्रग्जची एक पुडी दिली जाईल, असे विधान केले.
यावरून तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पुजारी आक्रमक झाले असून, यामुळे महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या भावना दुखवल्याचे म्हणणे आहे. याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. तानाजी सावंताविरोधात तुळजापुरातील पुजारी आक्रमक झालेत. तानाजी सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पुजाऱ्यांनी केली.
जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांना निवेदन देत, तानाजी सावंत यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. चार दिवसांपूर्वी जिल्हापरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या मेळाव्यात तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी तुळजापूरात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिला, आता मातेच्या प्रसादा देण्याऐवजी येणाऱ्या भक्तांना ड्रग्जची एक पुडी दिली जाईल, असं विधान केलं.
तानाजी सावंत यांच्या याविधानावरून पुजारी आक्रमक झालेत. तसेच जाहीर सभेत तानाजी सावंतांनी तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याच्या पवित्रतेवरही संशय निर्माण केला म्हणत, पुजाऱ्यांनी तानाजी सावंतांविरोधात गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच तानाजी सावंत यांनी चूक मान्य करत जाहीर माफी मागावी, अशीही मागणी करण्यात आली.
तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण राज्यभर गाजले. याच प्रकरणात विनोद गंगणे यांना अटक झाली होती. ते जामिनावर सुटला. भाजपाने त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. विनोद गंगणे नगराध्यक्ष म्हणून जिंकून आले. त्यांच्या विजयानंतर आता शिंदेसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी भाजपा आणि आमदार राणाजगजित सिंह यांच्यावर हल्ला चढवला. ते आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडीही देतील असे सावंत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.