Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Politics: महात्मा गांधी आणि नथूराम गोडसे वादावर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिल्या महत्त्वाच्या टिप्स, म्हणाले...

Congress leader Balasaheb Thorat's tips to workers, Followers should be aggressive on Nathuram Godse, Godse supporters are in power-नथुराम गोडसे याचे समर्थक सत्तेत आहेत, त्यांचा आक्रमक होऊन प्रतिवाद करा

Sampat Devgire

Balasaheb Thorat News: नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणावर काँग्रेस नेत्यांनी आज आक्रमक भूमिका मांडली. नथुराम गोडसे समर्थकांचा तेवढ्याच आक्रमकपणे प्रतिवाद करावा. या निमित्ताने महात्मा गांधींचे विचार रुजविण्याची ही एक संधी आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा यावेळी घेण्यात आला. काँग्रेसला कोणत्याही पक्षाची किंवा युतीची गरज नाही. आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, असे यावेळी सांगण्यात आले.

उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि राज्याच्या अन्य भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. संदर्भात राज्य सरकारने टाळाटाळ आणि फसवा फसवी न करता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करावी, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानसिकता विशद केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला संघ वध म्हणतो. यातून त्यांना नथुराम गोडसे याचे उदातीकरण त्यांना करायचे आहे हे स्पष्ट होते.

नथुराम गोडसे यांचे समर्थन करणारे सध्या सत्तेत आहेत. त्यामुळे हा देश कसा चालला आहे हे दिसून येते. भारतीय जनता पक्षाचे विकृत मानसिकता यातून पदोपदी जाणवत आहे. त्याला आता जनता देखील कंटाळली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराची लढाई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लढावी लागेल. आपल्याला हा देश महात्मा गांधींच्या विचारावरच आणावा लागेल. संदर्भात कायम चर्चा उपस्थित केली जाते. वाद केला जातो.

या वादात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचा आक्रमकपणे प्रतिवाद करावा. ही आपल्याला महात्मा गांधींचे विचार रुजविण्याची एक संधी आहे. खोटा प्रचार करणाऱ्यांना प्रसंगी न्यायालयात देखील खेचले पाहिजे. कोणीही आरोप करीत असेल तर दुर्लक्ष न करता त्याला उत्तर द्या, असे थोरात म्हणाले.

देशाच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकला जातो. घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. त्याचे समर्थन करण्यासाठी देण्यात येणारी कारणे आणखी वाईट आहेत. यातून अशा लोकांची मानसिकता किती वाईट आहे हे स्पष्ट होते.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT