
Maharashtra politics : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिकमध्ये बदली झाली असून त्यांनी बुधवारी नाशिक जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. दरम्यान या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन व आयुष प्रसाद यांच्या जवळीकतेच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
साधारणत: दोन महिन्यांपूर्वी जळगावात महसूल दिन सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी आयुष प्रसाद यांच्या कामाचे चांगलेच कौतुक केले होते. आयुष प्रसाद यांना भाजपत या असे अप्रत्यक्ष निमंत्रण गिरीश महाजन यांनी दिले होते. दरम्यान राजकारणात येण्याच्या या चर्चांवर नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारताना आयुष प्रसाद यांनी भाष्य केले.
यासंदर्भात नाशिक येथे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आयुष प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, काय होतं की कधी कधी ज्यावेळी एखादी अर्धवट व्हिडीओ क्लीप आपल्यासमोर येते त्यावेळी त्यातील सुसंगतता गायब होते. तुम्ही संपूर्ण भाषण ऐकले तर त्यातून विषय पूर्णत: स्पष्ट होतो.
एक कार्यक्रम होता. ज्यात आपण सत्कार व लोकांना विविध लाभाचे वाटप केले. तेव्हा कार्यक्रमात काही मंत्री महोदय भाषण करत होते. ते म्हटले की, तुम्ही एवढे लोकाभिमुख काम केले आहे. तुम्ही लोकप्रिय झाला आहात. त्यामुळे तुम्ही राजकारणात जाण्यास इच्छुक आहात का, इच्छुक असाल तर आमच्याकडे या असे सकारात्मक भूमिकेतून त्यांनी म्हटले होते.
चांगले पत्रकार हवे, चागंले राजकारणी हवे.. सर्व क्षेत्रात चांगले काम करणारे लोक हवेत. अशा भूमिकेतून ते विधान होते. त्यामुळे कृपा करुन ते निगेटिव्ह घेऊ नका. राहिला माझा प्रश्न तर मी आपल्याला गॅरंटी देऊ शकतो की, प्रशासकीय सेवा सोडून आयुष्यात कधीही कुठल्याही प्रकारचा वेगळा मार्ग निवडण्याच्या विचारात मी नाही. मी युपीएससीसाठी खूप परिश्रम घेऊन इतपर्यंत आलो आहे. परिश्रमपूर्वक करुन लोकसेवा करीत आहे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.
जळगावातील कार्यक्रमात गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले होते?
प्रशासकीय सेवेत चांगले काम करणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. त्यामध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेही काम खूप चांगले आहे. कामही ते चांगले करतात आणि सगळ्यांना सांभाळून घेतात. सांगितलेलं काम ते पूर्णच करतात. पुढे मागे फार दिवस मी नोकरीत राहणार नाही, मला राजकारणात यायचं आहे असं ते म्हटले आहे असं मिश्किलपणे गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. आणि अशा माणसाची गरज आम्हाला देखील आहेच. केंद्रात आम्ही किती अधिकाऱ्यांना मंत्री केले आहे ते तुम्ही बघितले आहे. त्यामुळे मागे पुढे त्यांचाही विचार नक्कीच होईल असं गिरीश महाजन म्हणाले होते. यातून अप्रत्यक्षपणे महाजन यांनी आयुष प्रसाद यांना भाजपत येण्याची ऑफर दिल्याचे म्हटले गेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.