Shrirampur Political News : श्रीरामपूर मतदारसंघातील जनसंवाद यात्रेनिमित्त गावागावांत आमदार लहु कानडे हे बैठका घेत संवाद साधत आहेत.त्यांच्यासमवेत तालुका काँग्रेसमधील त्यांच्या गटाचे कार्यकर्तेही फिरताना दिसत आहेत. मात्र, मतदारसंघात काँग्रेसतंर्गत असलेल्या गटातटाच्या राजकारणात जनसंवाद यात्रेत तालुक्यातील संपूर्ण काँग्रेस अभावानेच दिसत असल्याचे चित्र दिसत आहे.
आमदार लहु कानडे (Lahu Kanade) यांनी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने श्रीरामपूर मतदारसंघातील आपली आगामी वाटचाल कशी असणार हे स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. श्रीरामपूर मतदातसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 2019 काँग्रेसच्या कानडे यांनी शिवसेनेचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला. कानडे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत.तसेच साहित्यिक म्हणून पण त्यांची ओळख आहे.
श्रीरामपूर तालुका काँग्रेसमध्ये नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे व आमदार लहु कानडे यांचे स्वतंत्र गट आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेही या दोन गटात विभागले गेले आहेत.पक्षाचे वरिष्ठ नेते कार्यक्रमासाठी आल्यावर दोन्ही गटात अनेकदा 'दिलजमाई' झाल्याचे भासवले जाते.मात्र, नेत्यांची पाठ फिरताच पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती दिसून येत अशीच एकंदरीत परिस्थिती आहे.
त्यामुळे जनसंवाद यात्रेत या राजकीय दुफळीची प्रचिती दिसून येत असल्याचे बोलले जातेय. काँग्रेसच्या(Congress) जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये याची कुजबुज नेहमी सुरू असते.सध्या आमदार लहु कानडे यांनी जनसंवाद यात्रा सूरु केलेली आहे.आमदार कानडे हे जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेत आपण आपल्या कार्यकाळात केलेली विकासकामे त्यांना सांगत आहेत.
पुढील वर्षी प्रथम लोकसभा तर त्यानंतर विधानसभा निवडणुका असणार आहेत.अशात शिर्डी लोकसभा आणि श्रीरामपूर विधानसभा या अनुसूचित जाती राखीव मतदातसंघातील राजकीय मतांचे गणितांची जुळवाजुळव सत्ताधारी आणि विरोधक यांना करावी लागणार आहे. लोकसभेसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे(Bhausaheb Wakchaure) इच्छुक आहेत आणि त्या दृष्टीने ते 'कामाला' लागले आहेत. त्यांचे वास्तव्य हे श्रीरामपूर शहरातच आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता आघाडीतील संभाव्य उमेदवारातील ताळमेळ आणि तत्पूर्वी पक्षांतर्गत गटातटातील मनोमिलन याची आवश्यकता आहे.अशातच हा समन्वय आघाडी आणि पक्षांतर्गत करावा लागणार आहे. त्याशिवाय मविआ'ला 2024ला विजय सोपा असेल का यावर राजकीय विश्लेषक मतमतांतरे व्यक्त करत आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.