Lahu Kanade : आज पिठावर कर लावला जात असताना आम्ही गप्पा

श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे ( Lahu Kanade ) यांनी एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारच्या कर विषयक नीतीवर जोरदार टीका केली.
Lahu kanade
Lahu kanadeSarkarnama
Published on: 
Updated on: 

महेश माळवे

Lahu Kanade : श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - देशात जीवनावश्यक वस्तूंनाही जीएसटी कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या विरोधात काँग्रेससह विविध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे ( Lahu Kanade ) यांनी एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारच्या कर विषयक नीतीवर जोरदार टीका केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाने आयोजित केलेल्या संगमनेर-लोणी-श्रीरामपूर-नेवासे या मुख्य रस्त्याच्या कडेला वृक्षारोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन गुजरे, जलसंपदाचे उपअभियंता कलापुरे, तसेच ग्रामसेवक पंधारे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे व पदाधिकारी उपस्थित होते.

Lahu kanade
लहू कानडेंची ससाणे गटावर अप्रत्यक्ष टीका : गद्दार म्हणणारे ढोंगी

आमदार लहू कानडे म्हणाले, ब्रिटिश सरकारने भारतीय जनतेवर केलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध भारतीय जनतेला जागृत करून संपूर्ण समाज स्वातंत्र चळवळीमध्ये उतरवण्याचे मोठे कार्य स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी केले. मिठावर कर लावला, तर मिठाचा सत्याग्रह केला. आज पिठावर कर लावला जात असताना आम्ही गप्पा आहोत. म्हणूनच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारतीय संविधानाने जनतेला दिलेला हक्क व अधिकार याचाही प्रचार आणि प्रसार करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सूचविले.

Lahu kanade
लहू कानडे म्हणाले, काँग्रेस देशात असा एकमेव पक्ष की, ज्याची जपवणूक जनता करतेय...

स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगताना आमदार कानडे यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना वंदन केले. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासही सांगितला. वृक्षारोपणाचा उपक्रम सुत्य आणि पर्यावरणावर पोषक असल्याचे कानडे यांनी सांगितले.

याप्रसंगी खंडाळ्याचे सरपंच अशोकराव पवार, भास्करराव ढोकचौळे, रामदास म्हसे, अमोल नगरकर, आप्पासाहेब ढोकचौळे, बापूसाहेब सदाफळ, अनिल ढोकचौळे, बाबासाहेब ढोकचौळे, विजय ढोकचौळे, राधाकिसन बोरकर, सुभाषराव पवार, नवनाथ ढोकचौळे, महेश ढोकचौळे, प्रसाद सोडनार व ग्रामस्थ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.