Rahuri Baramati By Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahuri Baramati By Election : राहुरी अन् बारामतीत काँग्रेसची रणनीती काय? वडेट्टीवार आक्रमक अन् वाढवली राजकीय उत्सुकता

Congress Vijay Wadettiwar hints that the party may take an independent stand within the Maha Vikas Aghadi for the upcoming Rahuri and Baramati by-elections : राहुरी अन् बारामती पोट निवडणुकीसाठी काँग्रेस आगामी काळात महाविकास आघाडीत वेगळी भूमिका राहणार असल्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले.

Pradeep Pendhare

Vijay Wadettiwar Congress : राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही जागा लढवण्याबाबत महाविकास आघाडीत मतमतांतरे दिसत आहेत. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लाढण्यास पूर्ण ताकदीनं निवडणूक लढणार असल्याचे संकेत देत विरोधकांना डिवचलं.

तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार सुप्रिया सुळे यांनी, महाविकास आघाडी बारामती निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केली. परंतु काँग्रेसचे विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राहुरी आणि बारामती पोट निवडणुकीबाबत आक्रमक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे या पोट निवडणुकीबाबत काँग्रेस नेमकी काय भूमिका असेल, याची उत्सुकता असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी राहुरी आणि बारामती पोट निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे. एकवेळ बारामती पोट निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. परंतु राहुरीबाबत साशंकता आहे. यातच काँग्रेसचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी पोट निवडणुकीबाबत आक्रमक भूमिका मांडली.

यातच मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमच्यावर निवडणूक लादल्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका मांडली. विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका मांडताना, बारामतीपेक्षा राहुरी विधानसभा मतदारसंघातबाबत भाजपला डिवचलं. विजय वडेट्टीवार यांच्या या आक्रमक प्रतिक्रियेवरून काँग्रेस इथं ताकद देणार असल्याचं दिसतं आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, "आम्ही देखील लढायला तयार आहोत. यापूर्वी त्यांची आमच्याबाबत तशी भूमिका होती का? आम्ही बऱ्याच ठिकाणी बिनविरोधची मागणी केली होती. पण त्यांनी उमेदवार उतरवले. नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला होता. तिथं बिनविरोध होऊ दिलं नाही. असं सरसकट बिनविरोध होणं शक्य नाही."

कर्डिलेंचा फडणवीसांवर भरोसा

अक्षय कर्डिले म्हणाले, दिवंगत कर्डिलेसाहेबांनी जनतेच्या स्वरूपात संपत्ती मिळावली आहे. ती माझ्यासोबत आहे. ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. भाजप आणि पक्ष नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याबाबतीत जो निर्णय देतील, तो मान्य राहिल.

कार्यकर्ते निवडणूक ठरवतील

प्राजक्त तनपुरे म्हणाले, "आमची संघटना आहे. तीन पिढ्यांपासून कार्यकर्ते जोडले आहे. भावनिक नातं निर्माण झालं आहे. नवीन कार्यकर्ते जोडले जात आहे. माझ्या एकट्याला म्हणण्यात काही अर्थ नाही. कार्यकर्त्यांच्या मताचा आदार राखणं, ते म्हणतील, तसा निर्णय मतदारसंघात घेऊ."

बारामती पोट निवडणुकीसाठी सुळेंची भूमिका

बारामती पोट निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार सुप्रिया सुळे म्हणाले, 'सुनेत्रावहिंनीच्या विरोधात उमेदवार देणार नाही. महाविकास आघाडी बारामतीची सीट लढणार नाही.' राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात नसेल हे स्पष्ट आहे. तसेच महाविकास आघाडीची देखील बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची मानसिकतेत नाही, असेही त्यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT