Baramati And Rahuri by election : विखेंकडून राहुरी–बारामती पोटनिवडणुकीची तारीख जाहीर; ‘मविआ’,‘महायुती’समोर टाकली मोठी अट

BJP state vice president urges Mahayuti and MVA leaders to avoid contest and ensure smooth bypoll process in Rahuri and Baramati : राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी महायुती आणि मविआच्या नेत्यांना भावनिक आवाहन केलं आहे.
Baramati And Rahuri by election
Baramati And Rahuri by electionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly by election : भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत तारखांची घोषणा करत मविआ आणि महायुतीकडे मोठी मागणी केली.

या दोन्ही जागा बिनविरोध व्हावेत, यासाठी दोन्ही बाजूने सामंजस्याने भूमिका घ्यावी, आपण त्यासाठी सर्वोपरी सहकार्याची भूमिका घेऊ, असे विखे पाटील यांन म्हटले.

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची दहा ते 12 मार्चमध्ये घोषणा होईल, असे सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी सांगितले. बंगाल, तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी आणि आसाम या पाच राज्याच्या निवडणुकीबरोबर महाराष्ट्रातील पोट निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्रातील बारामती (Baramati) आणि राहुरी या दोन ठिकाणी पोटनिवडणूक होईल. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधानानंतर तिथल्या जागेची जबाबदारी आमची आहे. राहुरीमधील उमेदवाराबाबात आपण भाष्य करण्याचा अधिकार नाही. तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे अधिकार आहे, असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Baramati And Rahuri by election
Beed SSC exam copy scam : कॉपीचा नवा फंडा: ‘बीड पॅटर्न’कडून परीक्षा व्यवस्थेची पोलखोल! केंद्रावरील पर्यवेक्षकांसह शिक्षकांचाही हात?

आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे की, शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना तिथं संधी मिळावी. कार्यकर्त्यांची देखील तशी भावना आहे. कार्यकर्त्यांनी नेता म्हणून त्यांची भावना माझ्याकडे व्यक्त केली. माझा नेता मुख्यमंत्री आहे. आता इथल्या उमेदवाराचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

Baramati And Rahuri by election
Baba Siddique murder motive : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांचा कोर्टात स्फोटक दावा; शहझीन सिद्दीकींचा आरोप फेटाळत ‘खरं कारण’ प्रतिज्ञापत्रात स्पष्ट!

मुख्यमंत्री राहुरील जनभावनेचा आदर करतील, अन् उमेदवाराला संधी देतील. आम्ही देखील निवडणुकीला समोरे जाण्यासाठी सज्ज आहोत. निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहोत. महाराष्ट्रात दोन पोटनिवडणुका होत आहे.राहुरीबरोबर बारामतीचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दोन्ही आघाड्यावर याबाबच चर्चा होईल. अनेक राजकीय घडामोडी घडतील, असे सांगताच राहुरी विधानसभेत महायुती, त्यात भाजपचाच आमदार होईल, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.

राहुरी आणि बारामतीमधील रिक्त झालेल्या जागांवर दिग्गज नेते होते. दोन्ही जागांवरील उमेदवारांचे मृत्यू दुर्दैवानं झाले. कर्डिले यांचे निधन अचानक झालं, तर अजितदादांचे अपघाती निधन हे दुर्भाग्यपूर्ण होती. त्यामुळे महाराष्ट्राने आदर्श घडवावा, दोन्ही विधानसभेत तडजोड करून, सकारात्मकतेने बिनविरोध कराव्यात, अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com