Devendra Fadanvis & Hanumant Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Politics: काँग्रेस प्रवक्त्यांचा इशारा, मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घ्या, अन्यथा...

Congress warns state government for loan waiver, write off loan immediate, Declaring wet drought -संकटग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करून रब्बी हंगामासाठी एक लाखाचे कर्ज द्या, अन्यथा सरकारला स्वस्थ बसू देणार नाही.

Sampat Devgire

Loan waiver News: अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचा विषय गंभीर बनला आहे. या प्रश्नावर विरोधी पक्ष राज्य सरकार विरोधात आक्रमक आहे. काँग्रेस पक्षाने राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी कर्जमाफी अपरिहार्य आहे, असे पवार म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत करण्याचे जाहीर केले होते. राज्यात अतिवृष्टीमुळे खरिपाची सर्व पिके नष्ट झाली आहेत. पुरामुळे शेती वाहून गेली आहे.मात्र राज्य सरकार अद्याप निर्णय घेऊ शकलेली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

काँग्रेस प्रवक्ते पवार यांनी राज्य शासनाकडून संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात चालढकल होत असल्याचा आरोप केला. काँग्रेस नेत्यांनी या नैसर्गिक संकटात राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. या दौऱ्यात शेतकऱ्यांची स्थिती दयनीय असल्याचे दिसले.

यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२३ मध्ये मदतीच्या निकषात बदल करणारे परिपत्रक काढले. त्या परिपत्रकात मदत घटवली. त्यामुळे राज्य शासनाने मदत व पुनर्वसनाच्या निकषात बदल करून तातडीने भरपाई द्यावी.

पिक विमा कंपन्यांनी देखील या संधीचा गैरफायदा घेतला आहे. शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने अहवाल घेऊन मदत होत नाही. या कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यावर सरकार कारवाई का करीत नाही असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते पवार यांनी केला.

शेतकऱ्यांची आणि जनतेची अवस्था बिकट असताना राज्य सरकार मदत करीत नाही. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा काँग्रेस पक्षाकडून राज्यभर आंदोलन केले जाईल. राज्यात रेल रोको, रास्ता रोको यांसह सरकारच्या प्रत्येक कार्यालयाविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

राज्य शासनाचे विविध मंत्री मदतीबाबत घोषणा करतात. त्यात कुठेही समन्वय दिसत नाही. अशा संकटाच्या वेळी देखील सरकार संवेदनशील दिसत नाही, याची खंत पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT