MLA Kunal Patil
MLA Kunal Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress: जनप्रबोधनासाठी काँग्रेसची धुळे जिल्ह्यात पदयात्रा

Sampat Devgire

धुळे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त (75th indipendence on Nation) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे (Congress) आझादी गौरव वर्ष साजरे केले जाणार आहे. त्यानुसार ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानुसार येथे तीन ठिकाणी ७५ किलोमीटरची पदयात्रा काढली जाणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष शिरीष चौधरी (Shirish Choudhary) व प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Dhule congress will awakening people in dhule on 75th indipendence of India)

प्रदेश सचिव युवराज करनकाळ, जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर उपस्थित होते. श्री. चौधरी, आमदार पाटील यांनी सांगितले, की स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचा मोठा वाटा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात उभारण्यात आलेल्या लढ्यात अनेकांनी सहभाग नोंदविला. याबाबत माहिती देऊन व त्यांच्यासह परिवाराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पदयात्रा काढली जाईल. गाव, तालुका पातळीवरही पदयात्रा काढली जाईल. त्यात नऊ ऑगस्टला चिमठाणे येथील क्रांतीस्मारक ते दोंडाईचा व त्याच दिवशी शिरपूर तालुक्यात मालकातर ते बोराडी, अशी पदयात्रा काढली जाईल.

शिवाय दहा ऑगस्टला सकाळी आठला तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांची गावे, अशी ओळख असलेल्या कापडणे ते लामकानी, अशी २९ किलोमीटरची पदयात्रा काढली जाईल. तसेच १२ ला साक्री तालुक्यात दहिवेल ते आमळी पदयात्रा निघेल. अशा ७५ किलोमीटरच्या पदयात्रेत कापडणे येथून काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात सहभागी होतील.

धुळे शहरात १४ ऑगस्टला पदयात्रा असेल. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. प्रत्येक गावात स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू. स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसच्या योगदानाची माहिती देऊ, असे श्री. चौधरी, आमदार पाटील यांनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT