Dilip Datir
Dilip Datir Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News: `मनसे`च्या शहराध्यक्षांनी ठेकेदाराकडे पैसे मागीतले?

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) कचरा उचलणे तसेच रस्त्यांच्या सफाईचे कंत्राट महापालिकेने (NMC) ‘वॉटरग्रेस’ (Watergrace) या कंपनीला दिले. त्यांनी कामगारांना काढून टाकल्यावर `मनसे`ने (MNS) त्याविरोधात आंदोलन सुरु केले होते. त्याबाबत या कंपनीने `मनसे`चे शहराध्यक्ष दिलीप दातीर (Deelip Datir) यांनी पैसे मागीतल्याचा खळबळजनक आरोप केल्याने `मनसे` विरुद्ध ‘वॉटरग्रेस’ प्रकरण चांगलेच गाजण्याची शक्यता आहे. (MNS vs Watergrace contractor issue may take Serious turn in Nashik)

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना वॉटरग्रेस कंपनीकडून बदनामी केल्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. १४ दिवसात या संदर्भात खुलासा करावा, अशी मागणी नोटिशीमध्ये करण्यात आली आहे.

महापालिकेकडून पूर्व व पश्चिम विभागातील अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी मे. वॉटरग्रेस कंपनीला काम दिले आहे. दिवाळीत कंपनीकडून जवळपास साडेचारशे स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचा आरोप करत मनसे शहराध्यक्ष दातीर यांनी २० फेब्रुवारीला महापालिकेसमोर उपोषण सुरू केले.

त्यापूर्वी दातीर यांनी पत्रकार परिषद घेऊन वॉटरग्रेस कंपनीचे संचालक चेतन बोरा यांच्यावर आरोप केले. कर्मचाऱ्यांना २५ ते २७ हजार रुपये मिळत असताना फक्त बारा हजार रुपये त्यांना दिले जातात. स्वच्छतेचे काम करताना पूरक साहित्य पुरविले जात नाही.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड हे बोरा यांचे नातेवाईक आहेत, अशा प्रकारचे विविध आरोप करताना माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचेदेखील नाव घेतले.

त्याअनुषंगाने वॉटर गेस कंपनीचे संचालक चेतन बोरा यांनी सीके लीगल असोसिएटतर्फे रात्री यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. १४ दिवसात नोटिशीला उत्तर न दिल्यास कायदेशीर दावा दिला आहे.

दरम्यान, दिलीप दातीर त्यांनी महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन करताना ते आंदोलन हे बेकायदेशीर असल्याने त्यांच्यावर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता वॉटरग्रेस कंपनीकडून फायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याने दातीर यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT