Sujay Vikhe Nilesh Lanke sakarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : नगर हबकलं, नीलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्राला रात्रभर खडा पहारा...

Pradeep Pendhare

Lok Sabha Election 2024 : मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिलेत. उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांचे कार्यकर्ते अधिकच अलर्ट झालेत. आजच्या रात्री कोणताच हलगर्जीपणा न करण्याचा चंग नीलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी उद्या मतमोजणी स्थळी जात असलेल्या प्रतिनिधींची बैठक घेऊन डोळ्यात तेल घालून उभे राहा, अशा सूचना केल्यात. तसेच काही कार्यकर्ते मतमोजणी स्थळी आजची रात्र जागून काढणार आहेत. कोणताही हलगर्जीपणा नको, अशा सूचना नीलेश लंके प्रतिष्ठानकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान झाले. तेव्हापासून नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हा प्रशासनाच्या सीसीटीव्ही स्ट्राँग रूममध्ये तळ ठोकून आहेत. या स्ट्राँग रूममध्ये नीलेश लंके प्रतिष्ठानकडून तीन शिफ्टमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक शिफ्टसाठी चार कार्यकर्ते स्ट्राँग रूममध्ये नियुक्त होते. मतमोजणी केंद्रात किंवा केंद्राभोवती संशायस्पद हालचाली झाल्या तरी, त्याची तक्रार होत होती. मतमोजणीच्या स्थळी सीसीटीव्ही पुरवठादार गेल्यावरून, त्यावरून गोंधळ झाला होता. आता तर मतमोजणीच्या पूर्वीची रात्र आहे. त्यामुळे नीलेश लंके यांचे कार्यकर्ते अधिक अलर्ट झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी मतमोजणीला समोरे जात असलेल्या प्रतिनिधींची आज रात्री बैठक घेतली. सुमारे चारशे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना मतमोजणीवेळी कोणताच हलगर्जीपणा नको, अशा सूचना केल्या. शंका असल्यास त्यावर अधिकाऱ्यांवर थेट विचारा. हरकत घ्या. मी अलर्टच आहे. मला सांगा. पुढे काय कार्यवाही करायची ते मी पाहतो. पण मतमोजणीत कोणताच गहाळपणा करू नका, अशा सूचना नीलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतमोजणी पूर्वीचा आजची रात्र देखील महत्त्वाची असल्याकडे नीलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले. मतमोजणी केंद्रावर आजच्या रात्री अधिकच सजग राहा. वेळप्रसंगी रात्री जागून काढा. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवा. डोळ्यात तेल घालून आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवा. पण गहाळ राहू नका, अशा सूचना केल्या. नीलेश लंके यांचे कार्यकर्ते नगरमध्ये आज रात्री तळ ठोकण्यासाठी दाखल झाले आहेत. या हालचालींमुळे नगर शहर पोलिस देखील अलर्ट झाले आहेत.

नीलेश लंके आणि त्यांचे कार्यकर्ते निवडणूक जाहीर झाल्यापासून, निवडणुकी वेळी, मतदानाच्या दिवशी, मतदान झाल्यानंतर आणि उद्या होत असलेल्या मतमोजणीपर्यंत दाखवलेला अलर्टपणा चर्चेचा विषय ठरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT