Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : नगरमध्ये विखेंच्या 1991 च्या पराभवाचीच चर्चा; पवारसाहेबांचा पठ्ठया लंके ठरणार जायंट किलर?

Lok Sabha Election 2024 Exit Poll Ahmednagar Constituency Will Nilesh Lanke Defeat Sujay Vikhe : नगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे यांचा निलेश लंके पराभव करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Radhakrishna Vikhe, Sujay Vikhe, Balasaheb Vikhe, Nilesh Lanke, Sharad Pawar
Radhakrishna Vikhe, Sujay Vikhe, Balasaheb Vikhe, Nilesh Lanke, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे वडील आणि महसुलमंत्री राधाकृष्ण विखेंनी रविवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची शरम काढली. एवढा संताप पाहून नगरकरांना नक्कीच 1991 ची निवडणूक आठवली असेल. यावेळी विखे विरुध्द लंके असा सामना होत असला तरी खरी लढत विखे विरुध्द पवार अशीच होत आहे. 1991 मधील पराभवाची पुनरावृत्ती होण्याची भीती तर विखेंना वाटत नसेल ना, अशी चर्चा आता नगरमध्ये झडू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे यावेळी जायंट किलर ठरणार असल्याचे संकेत बहुतेक एक्झिट पोलने दिले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार विखे पिछाडीवर दाखवले जात असल्याने पिता-पुत्राला धडकी भरल्याचे त्यांच्या विधानांवरून स्पष्ट होत आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याविषयी बोलताना राधाकृष्ण विखेंचा पारा काल चांगलाच चढला. थोरांताना शरम वाटली पाहिजे, असे सुनावतानाच विखे यांनी त्यांचा समाचार घेतला. स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात. पण जिल्ह्यात एकही जागा पक्षासाठी घेऊ शकले नाहीत. दुसऱ्याची तळी उचलण्यात धन्यता मानतात. यातून त्यांची वैचारीक दिवाळखोरी सिद्ध होते, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

एक्झिट पोलच्या अंदाजानंतर विखेंचा पारा का चढला, याची चर्चा सुरू असतानाच 1991 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि विखे विरुध्द पवार संघर्षाची आठवणींनाही पालवी फुटली आहे. त्यावेळी बाळासाहेब विखे विरुध्द यशवंतराव गडाख अशी लढत झाली, पण खरा संघर्ष होता तो विखे आणि शरद पवारांमधील.

Radhakrishna Vikhe, Sujay Vikhe, Balasaheb Vikhe, Nilesh Lanke, Sharad Pawar
Ahmednagar Lok Sabha Exit Poll : विखेंची भिस्त आता विठुरायावरच! एक्झिट पोलनंतर आत्मविश्वास डळमळला?

काय घडलं होतं 1991 मध्ये?

बाळासाहेब विखे आणि शरद पवारांमधील वाद 1991 मध्ये विकोपाला गेला होता. विखेंनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकावल्यानंतर त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते. यशवंतराव गडाख यांना तिकीट मिळालं आणि त्यांना विजयी करण्याची जबाबदारी शरद पवारांवर आली. विखेंचा पराभव झाला आणि त्यांनी हायकोर्टात धाव घेतली.

गडाख भ्रष्ट मार्गाने, आपले चारित्र्यहनन करून निवडून आल्याचा आरोप करत त्यांची निवड बेकायदेशीर ठरवण्याची मागणी विखेंनी केली होती. विखेंनी पवारांनाही अडचणीत आणत खटलाही जिंकला. कोर्टाने गडाखांची निवड रद्द करत विखेंना विजयी घोषित केले. त्याविरोधात गडाख सुप्रीम कोर्टात गेले. तिथे विखेंना विजयी घोषित करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला. मात्र, गडाखांची निवडही अवैध ठरवली.

संघर्ष अन् पराभवाची पुनरावृत्ती?

1991 पासून विखे आणि पवारांमधील हे राजकीय वैर सुरू झाले. 2024 च्या निवडणुकीतही हा राजकीय संघर्ष प्रकर्षाने पुढे आला. प्रचारादरम्यान एकमेकांवर जोरदार टीका, चिखलफेक झाली. आता एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर विखे पिछाडीवर असल्याचे संकेत मिळाले. मात्र, प्रत्यक्ष निकाल काय लागणार, 1991 च्या पराभवाची पुनरावृत्ती होणार की विखे पुन्हा सत्ता राखणार, हे पुढील 20 तासांत स्पष्ट होईल.

Radhakrishna Vikhe, Sujay Vikhe, Balasaheb Vikhe, Nilesh Lanke, Sharad Pawar
Radhakrishna Vikhe On Balasaheb Thorat : पुत्राची खासदारकी धोक्यात; मंत्री विखे संतापून म्हणाले, 'बाळासाहेब थोरातांना शरम वाटली पाहिजे'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com