PI Kirankumar Bakale
PI Kirankumar Bakale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

वादग्रस्त बकालेंना उद्या तरी जामीन मिळेल का?

Sampat Devgire

जळगाव : मराठा समाजाविषयी (Maratha Community) आक्षेपार्ह्य वक्तव्य करणाऱ्या निलंबित पोलिस निरीक्षक (police Inspector) किरणकुमार बकाले (Kirankumar Bakale) व हजेरी मास्तर अशोक महाजन (Ashok Mahajan) यांच्या संभाषणाची ती वादग्रस्त ऑडिओ क्लिप न्यायालयात (Court) सादर करण्यात आली. न्यायालयाने संपूर्ण क्लिप ऐकल्यानंतर महाजन यांच्या जामीनावर उद्या कामकाज होणार आहे. ( Court will hear pleading tomorrow on Police inspector Kirankumar Bakale)

जिल्‍हा व सत्र न्यायालयात गुन्हेशाखेचा तत्कालीन हजेरी मास्तर अशोक महाजन याच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. त्या अर्जाच्या कामकाजात आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे म्हणत साक्षीदार किरण बोरसे आणि पाचोरा येथील पाटील अशा दोघांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. महाजन यांचे वकील ॲड. केदार भुसारी यांनी अशोक महाजन व किरणकुमार बकाले यांच्यातील मोबाईल संभाषणाची ऑडीओक्लिप असलेला पेनड्राईव्ह न्यायालयात सादर केला.

न्या. एस. एन. माने (गाडेकर) यांच्या न्यायालयाने दोन वेळेस ही ऑडिओ क्लिप शांतपण ऐकली. त्यावर ॲड. भुसारी यांनी त्यांचे म्हणणे सादर केले. सलग दोन दिवस या प्रकरणावर युक्तिवाद झाल्यावर गुरुवार(ता.२०) रोजी उर्वरित कामकाज होणार आहे.

बकालेंनाही गुरुवार

किरणकुमार बकाले यांचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण होऊन त्यावर गुरुवार (ता.२०) रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT