जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या (Jalgaon Milk Fedration) संचालकपदाच्या निवडणुकीसाठी (Election programme) ४४१ मतदारांची अंतिम यादी बुधवारी जाहीर झाली. येत्या महिनाभरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, (Girish Mahajan) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात दूध संघाची सत्ता मिळविण्यासाठी राजकीय संघर्षाची ठिणगी पडेल. (BJP & NCP politics will be a high voltage drama in Jalgaon Politics)
मतदार यादीत वरिल नेत्यांसह दूध संघाच्या विद्यमान चेअरमन मंदाकिनी खडसे, जिल्हा दूध संघाचे माजी प्रशासक व गैरव्यवहाराची तक्रार करणारे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांचा सामावेश आहे.
जिल्हा दूध संघ निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नाशिक विभागीय उपनिबंधक (सहकार) यांच्यातर्फे आज संचालकपदासाठी मतदारांची यादी जाहीर करण्यात आली. यापूर्वी काही मतदारांवर घेतलेल्या सर्व हरकती फेटाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतिम यादीचीच प्रतिक्षा होती. नाशिक विभागीय उपनिबंधक (सहकार) यांच्या कार्यालयात ही यादी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध करण्यात आली. निवडणुकीसाठी आता ४४१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
दिग्गज नेतेही मतदार
जिल्हा दूध संघाच्या मतदार यादीत जिल्ह्यातील दिग्गज नेते आहेत. यात पालकमंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील (वडली संस्था, ता. जळगाव)येथून मतदार आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश दत्तात्रेय महाजन (विठ्ठल रुक्मिणी संस्था, शेंदुर्णी ता. जामनेर), संघाच्या विद्यमान चेअरमन मंदाकिनी खडसे (मुक्ताई संस्था, कोथळी), आमदार मंगेश चव्हाण (पिंपळवाड म्हाळसा संस्था ता. चाळीसगाव), आमदार किशोर धनसिंग पाटील (विजय संस्था, अंतुर्ली खुर्द ता. पाचोरा), आमदार अनिल भाईदास पाटील (गुरूदत्त संस्था, खवशी ता. अमळनेर), आमदार चिमणराव रूपचंद पाटील (देवगाव संस्था, देवगाव ता.पारोळा) येथून मतदार आहेत.
या शिवाय इतर दिग्गज असे महापौर जयश्री सुनील महाजन (किसान संस्था, असोदा ता. जळगाव), छाया गुलाबराव देवकर (श्रीकृष्ण संस्था शिरसोली ता.जळगाव), रवींद्रभय्या पाटील (मनूर संस्था, ता. बोदवड), रोहिणी एकनाथ खडसे (वल्लभभाई संस्था, घाणखेड ता.बोदवड), पराग वसंत मोरे (उदय संस्था जोगलखेडे ता. पारोळा), वसंतराव जीवनराव मोरे (आडगाव संस्था ता. पारोळा), डॉ. सतीश भास्कर पाटील (तुळजाई संस्था, पारोळा), संजय मुरलीधर पवार (तुळजाई संस्था, भोद ता. धरणगाव), सोनल संजय पवार (गायत्री संस्था, साळवा ता. धरणगाव), वाल्मीक विक्रम पाटील (लोहटार संस्था ता. पाचोरा), जयश्री अनिल पाटील (भाग्यलक्ष्मी संस्था ता. अमळनेर), दिलीप ओंकार वाघ (श्रीकृष्ण संस्था राणीचे बांबरूड, ता. पाचोरा), स्मिता उदय वाघ (उंधाटी संस्था ता. अमळनेर), भागचंद मोतीलाल जैन (ओम साई संस्था, बामणे ता. एरंडोल).
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.