Sandip Karnik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Police Action: नायलॉन मांजावर ‘संक्राती’साठी पोलिस आयुक्त सरसावले, त्यांच्या मदतीला नेते कधी येणार?

CP Sandeep Karnik; Police active in Nashik Nylon Manja parents also got custody-सामान्यांच्या जीवावर भेटणाऱ्या नायलॉन मांजा बाबत राजकारणी आणि नेते अलिप्तच

Sampat Devgire

Nashik News: यंदाची संक्रात कोणावर होती, या प्रश्नाचे उत्तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर असेच आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात नायलॉन मांजा मुळे दोन जणांना जीव गमवावा लागला. एक महिला पोलीस गंभीर जखमी झाली.

या संदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सुरुवातीपासूनच ॲक्शन मोडवर होते. नायलॉन मांजामुळे होणारे जीव घेणे प्रकार त्यांनी गांभीर यांनी घेतले होते. याबाबत थेट कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलिसांनाही मोकळीक मिळाली.

या संदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांना याबाबत कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यांनी नायलॉन मांजाचा वापर होऊ नये, यासाठी नागरिकांना आवाहनही केले होते. मात्र आमदार फरांदे यांचा अपवाद वगळता अन्य लोकप्रतिनिधी याबाबत फारसे पुढे आले नाही, ही खेदाची बाब म्हणावी लागेल.

यासंदर्भात नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना वचक बसावा म्हणून पोलिसांनी मोहीम राबविली. विशेष म्हणजे यामध्ये नायलॉन मांजा बाळगणारी व पतंग उडवणारी बहुतांशी मुले अल्पवयीन होती. त्यामुळे त्यांच्या पालकांवर मोठी जबाबदारी येते. मात्र शहरात पोलीस कारवाईत सुशिक्षित पालकच अडथळा बनल्याचे प्रकार पुढे आले.

यासंदर्भात पोलिसांनी चार दिवसात ८२ जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये नऊ मुलांच्या पालकांवरही गंभीर कारवाई करण्यात आली. या पालकांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. त्यामुळे यंदाची संक्रांत नायलॉन मांजा वापरणाऱ्या मुलांच्या पालकांवर बेतली, असेच म्हणता येईल.

नायलॉन मांजामुळे मुंबई आग्रा महामार्गावर एका बावीस वर्षीय युवकाला प्राण गमवावे लागले. तो त्या कुटुंबातील एकुलता एक कमावणारा होता. चार महिन्यांनी त्याचा विवाह होणार होता. अशा परिस्थितीत नायलॉन मांजाने एक कुटुंब उध्वस्त केले. अन्य एकाला देखील जीव गमवावा लागला. मनमाड येथे एक महिला पोलिस गंभीर जखमी आहे.

शहरात दिलासादायक बाब म्हणजे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अतिशय धडक मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांनी नायलॉन मांजा विरोधात कारवाई प्राधान्याची बनवली, हा एक मोठा दिलासा मानला जातो. शहरात 80 पेक्षा जास्त सदोष मनुष्यवदाचे प्रयत्न झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.

बऱ्याच प्रकरणांत संशयीतांना अटक झाली आहे. काही गुन्ह्यात संबंधितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. लवकरच याबाबत आरोपपत्र दाखल करणार असल्याचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले.

एकंदरच नायलॉन मांजपुढे आयुष्याची दोरीही कमकुवत झाल्याचे दिसले. त्यामुळे नायलॉन मांजापेक्षा सामान्यांच्या आयुष्याची दोरी बळकट असणे आणि टिकणे अधिक महत्त्वाचे आहे. संक्रांतीच्या सण एक दिवसाचा असतो. मात्र त्यात पारंपरिक साधेपणा टिकविण्याची जबाबदारी आणि समज पालकांमध्ये येत नसेल तर समाजासाठी हा एक धोकादायक संदेशच मानला पाहिजे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT