Jayant Patil
Jayant Patil Sarkarnam
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil: पक्षांतर करणाऱ्या आमदारांविरोधात ‘रान पेटवा’

Sampat Devgire

जळगाव : पक्षांतर करणे (Tergiversation) लोकांना आवडत नाही, त्यातच काही ‘आमिष’ (Inducement) घेऊन गेले असतील तर जनतेला (Peoples) ते अजिबात पसंत पडत नाही, त्याविरुद्ध जनतेत चीड निर्माण होते. त्यामुळे शिवसेनेतून (Shivsena) पक्षांतर करून काही आमदार शिंदे गटात (Eknath Shinde) गेले आहेत, त्यांनी पक्षांतर कशासाठी केले आहे, त्याचीही चर्चा आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी या बंडखोर आमदारांविरोधात वातावरण निर्मिती करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतस पाटील यांनी केले. (NCP State president Jayant patil said Mahavikas Agahadi jointly face election)

या संदर्भात कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन त्यांच्या पक्षांतराविरूध्द जागृती निर्माण करा त्यामुळे जनतेत त्यांच्याविरुद्ध रोष निर्माण होईल व जनता त्यांना स्वीकारणार नाही, त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येण्यास फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आगामी निवडणुकीत शिवसेना, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जळगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, की आगामी दोन वर्षात विधानसभेच्या निवडणुका होतील, जर हे सरकार कोसळले तर त्याआधीही निवडणुका होतील. जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. आपला पक्ष मतदार संघात बळकट झाला तर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणारच आहे.

ते म्हणाले, त्यामुळे आम्ही मतदार संघात बळकट आहोत, असे सांगून आपल्याला त्या मतदार संघावर दावा सांगता येईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना विकास निधी न मिळाल्याचेही आमदार जयंत पाटील यांनी मान्य केले. मात्र आगामी काळात त्यातील चुका दुरुस्त करण्यात येतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT