MVP Election: महाराज असते, तर विरोधकांचा कडेलोट केला असता

नीलिमाताई पवार यांनी निफाडला विजय संकल्प सभेत विरोधकांवर घणाघात केला.
Nilimatai Pawar
Nilimatai PawarSarkarnama

नाशिक : निफाड तालुका नाशिक (Nashik) जिल्ह्याचा कारभारी असून, मराठा विद्याप्रसारक समाज (MVP) संस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्यामुळे एकही चुकीचा माणूस निवडून न देता पूर्ण प्रगती पॅनलला (Pragati Panel) निवडून द्या, असे आवाहन करताना विरोधक छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) छायाचित्राचा आधार घेत संस्थेची सत्ताधाऱ्यांच्या तावडीतून सुटका करा, असे सांगताहेत, हे न शोभणारे आहे. शिवाजी महाराज आज असते, तर विरोधकांच्या टीकेचा खालावलेला दर्जा पाहून कडेलोट केला असता, असा घणाघात नीलिमाताई पवार (Nilimatai Pawar) यांनी शनिवारी केला. (Nilimatai Pawar criticise Nitin Thackray)

Nilimatai Pawar
Shiv Sena : अरविंद सावंत, भास्कर जाधवांना बढती, शिवसेनेच्या सचिवपदी पराग डाके

निफाड येथील शिवनेरी लॉन्स येथे प्रगती पॅनलतर्फे झालेल्या विजय संकल्प सभेत त्या बोलत होत्या. जानकीराम धारराव अध्यक्षस्थानी होते. श्रीराम शेटे, सुरेशबाबा पाटील, रामचंद्रबापू पाटील, आमदार राहुल ढिकले, राहुल आहेर, भरत कोकाटे, भास्कर बनकर, अॅड. नानासाहेब जाधव, डॉ. सुनील ढिकले, राजेंद्र मोगल, रायभान काळे, सचिन पिंगळे आदी उपस्थित होते.

Nilimatai Pawar
Shivsena : कॅबिनेट मंत्री झालेल्या भुमरेंच्या मतदारसंघातील कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या

या वेळी श्रीमती पवार यांनी विरोधकांच्या आरोपांचे खंडन करताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपण बाह्यशक्ती संबोधले नसून, बाह्यशक्ती या नाशिक जिल्ह्यातील इतर समाजातील आहेत, तसेच पवारसाहेब हे सर्वच पक्षांचे राजकीय गुरू व संस्थेचे मार्गदर्शक आहेत. डॉ. वसंतराव पवारांनी नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली शाखा स्थापन करून जिल्हाभर पक्ष वाढविला. बाह्यशक्तींनी उमेदवारांवर दबाव आणत समोरच्या बाजूने उमेदवारी करण्यास भाग पाडले. तसेच संस्था रसातळाला नेण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. संस्थेला अडचणीत आणणाऱ्यांना बाजूला करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

भरत कोकाटे यांनी केदा आहेर व डॉ. सुनील ढिकले यांनी राजकीय वारसदार असताना आपल्या लहान भावांना आमदार करून समाजाला आदर्श घालून दिला. समाजातील प्रत्येक भावाने असा आदर्श घ्यावा, असे सांगितले.

ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी संस्थेची पायाभरणी ही शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकतेवर झाली असून, पारदर्शकता जपण्याचे काम नीलिमाताई व सहकाऱ्यांकडून आजही सुरू आहे. हजारो एकर जमिनी व कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेली संस्था कोणाच्या हातात द्यायची, हे सभासदांनी ठरवावे.

आमदार राहुल ढिकले यांनी ‘नीलिमाताई समाजाला दिशा देण्याचे काम करीत असून, ‘मविप्र’ संस्था चांगल्या हातात देऊन भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल करा, असे सांगताना निफाड तालुका जिल्ह्याचे नेतृत्व करणारा तालुका असून, येथील सभासद नीलिमाताई व ‘प्रगती’च्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील, यात काडीमात्र शंका नसल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

आमदार राहुल आहेर यांनी ‘मविप्र’ची निवडणूक ही जिल्ह्याच्या अस्मितेची निवडणूक असून, संस्थेच्या वाटचालीत सभासदांचा वाटा मोठा आहे. तोच वाटा संस्थेचे हित जोपासण्यात घ्या. नीलिमाताई यांनी संस्थेत मोठे काम उभारले असून, त्यांना पाठिंबा देऊन निवडून देण्याचे आवाहन केले.

राजेंद्र मोगल यांनी संस्थेची प्रगती व विचारांचा वारसा घेऊन ‘प्रगती’च्या सोबत आलो असून, कोरोनाकाळात डॉ. पवार रुग्णालयाने जिल्ह्यात संस्थेचे आदर्श आरोग्यकार्य उभे केले. समाजाच्या विकासासाठी तालुक्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. सरचिटणीस पदाचे उमेदवार अॅड. नानासाहेब जाधव यांनी आपला पाठिंबा ‘प्रगती’ला दिला. किशोर कदम यांनी सूत्रसंचालन केले.

अॅड. दामोदर पागेरे ‘प्रगती’च्या व्यासपीठावर

इगतपुरी येथील सभेत अॅड. दामोदर पागेरे यांनी ‘प्रगती’च्या व्यासपीठावर येत आपले समर्थन दिले. विरोधक करीत असलेल्या आरोपांचे खंडन करताना ‘परिवर्तन’मधील उमेदवारांनी आपली शैक्षणिक संस्था असताना आर्थिक स्वार्थासाठी उमेदवारी केल्याची टीका केली. तसेच संस्थेच्या विकासासाठी ‘परिवर्तन’ न करता ‘प्रगती’ला निवडून देण्याचे आवाहन केले.

राजाभाऊ वाजे यांचे ‘प्रगती’ला समर्थन

सिन्नर सभेत आमदार राजाभाऊ वाजे यांनी संस्था व समाजाच्या हिताला सभासदांनी सर्वोच्च प्राधान्य देऊन राजकारणात मोठी पदे भोगणाऱ्यांपेक्षा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या आत्मियतेला प्राधान्य देणाऱ्यांना हात द्या. सभासदांसाठी डॉ. पवार रुग्णालयात स्वतंत्र फ्लोअर ही सर्वांत महत्त्वाची घोषणा असून, स्वतःच्या शैक्षणिक संस्था असणाऱ्यांनी संस्थेत निवडणूक लढवू नये तसेच खासगी संस्थेत हितसंबंध असणाऱ्यांना निवडून देऊ नका, असे आवाहनही केले.

---------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com