Balasaheb Kshirsagar & D. K. Jagtap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lasalgaon APMC Politics: सभापती डी. के. जगताप यांच्या खुर्चीला फटाके? होणार 'नाशिक' बाजार समितीची पुनरावृत्ती?

D. K. Jagtap; Politics heats up as lasalgaon APMC chairman D. K. Jagtap falls into minority-लासलगाव बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप, उपसभापती ललीत दरेकर यांच्या पदांवर राजकीय संक्रात?

Sampat Devgire

Lasalgaon APMC News: लासलगाव बाजार समितीचा सभापती कोण? याचा निर्णय माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ घेत असतात. यंदाही त्यांनी सभापतींचे नाव सुचवले. मात्र निवड होताच हे सभापती राजकीय संकटात अडकले आहेत.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघातील लासलगाव बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. कोट्यावधींची उलाढाल होत असल्याने या बाजार समितीवर सत्ता गाजवण्यासाठी प्रत्येकाला इच्छा असते. त्यासाठी मोठ्या राजकीय तडजोडी, जमवाजमव आणि खेळी होते. यंदाही हेच राजकारण सुरू आहे.

या बाजार समितीत छगन भुजबळ आणि अन्य दोन गट एकत्र आले आहेत. रोटेशन नुसार अध्यक्षा आणि उपाध्यक्षांची सत्ता त्यात वाटून घेण्यात आली आहे. यंदा सभापती म्हणून भाजपचे डी. के. जगताप यांच्या नावाला भुजबळ यांनी संमती दिली. तेथूनच राजकीय वादाला सुरुवात झाल्याचे बोलले जाते.

बाजार समिती जयदत्त होळकर गटाकडून ललित दरेकर यांची उपसभापती पदी निवड झाली. मात्र सभापती डी. के. जगताप यांची कार्यपद्धती सर्वश्रुत आहे. त्यात त्यांना जयदत्त होळकर आणि राजेंद्र डोखळे यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे संचालक मंडळ साशऺक काय. त्यामुळेच उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची पाठ फिरतात राजकीय वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे पहिलीच बैठक गणपूर्ती अभावी स्थगित करावी लागली.

मात्र प्रतिस्पर्धी संचालक जागरूक असल्याने त्यांनी तो डाव उधळून लावला आहे. बाजार समितीच्या पहिल्याच बैठकीला राजकीय मतभेदांचे ग्रहण लागले आहे. सध्या सत्ताधारी गटात चेअरमन जगताप, व्हाईस चेअरमन ललित दरेकर, जयदत्त होळकर, राजेंद्र डोखळे, छबुराव जाधव, प्रवीण कदम आणि सुवर्णा जगताप एवढे सात संचालक राहिले आहेत. ते अल्पमतात आहेत.

प्रतिस्पर्धी गट देखील तेवढ्यात जागरूक आहे. त्यांनी आजच्या तहकूब बैठकीला हजेरी लावली. माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, पंढरीनाथ थोरे, डि. के. आवारे, सोनिया होळकर, तानाजी आंधळे, गणेश डोमाडे, भाऊराज काळे, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, बाळासाहेब दराडे आणि रमेश पालवे असे अकरा संचालकांनी वेगळी चूल मांडली आहे. यावेळी या संचालकांनी विविध समित्यांवरील नियुक्ती, कामाच्या सूचना व आर्थिक निर्णय याबाबत त्यांचे मत लिखित स्वरूपात दिले आहे. त्यामुळे सभापती आणि उपसभापती यांचे हात राजकीय संख्याबळाअभावी बांधले गेले आहेत.

या स्थितीचा विचार करता महिनाभरापूर्वी नाशिक बाजार समितीत सभापती देविदास पिंगळे यांचे संचालक प्रतिस्पर्धी गटाला मिळाले होते. त्यामुळे पिंगळे यांची सत्ता खालसा झाली. सध्या विरोधकांकडे बहुमत असल्याने लासलगाव बाजार समितीची राजकीय वाटचाल देखील नाशिक सारखीच तर सुरू नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT