Girish Mahajan & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse Politics: गिरीश महाजनांचा दावा, मात्र पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे अद्यापही आशावादी?

Dada Bhuse: Controversy over Guardian Minister post, Dada Bhuse still optimistic-राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेणार

Sampat Devgire

Dada Bhuse News: नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा प्रचंड ताणला गेला. गेले दीड महिना यावर चर्चेचा भुसा पडत आहे. आता यावर निर्णय घेतला गेल्याचे बोलले जाते, तरीही इच्छुक आशावादी आहेत.

पालकमंत्री पदाचा तिढा थेट भाजपनेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेला होता. या संदर्भात झालेल्या चर्चेत शहा यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांच्या बाजूने कौल दिल्याचे कळते. त्यामुळे नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा वाद आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे पक्षाचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नाव देखील चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी हट्ट धरला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्याने त्यावर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेणार होते. मात्र त्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या ताठर भूमिके पुणे निर्णय होऊ शकला नव्हता, असे समजते.

दरम्यान भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याचे बोलले जाते याविषयी चर्चा जोरात आहे या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मात्र अद्यापही पालकमंत्री पदाबाबत आशावादी असल्याचे चित्र आहे.

नाशिकचे पालकमंत्री कोण? याबाबत मंत्री भुसे यांना विचारणा केली असता लवकरच याबाबतचा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करणे सगळ्यांचे काम आहे. महायुतीचे सर्वच नेते त्याबाबत एकमताने कार्यवाही करतील असा दावा त्यांनी केला.

एकंदरच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय हा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोण? यावर देखील परिणाम करणारा आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत.

आमदारांची संख्या हा पालकमंत्री पदासाठी निकष मानला जातो. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद भाजपचे गिरीश महाजन यांच्याकडे गेल्यास रायगडचा तिढा कसा सोडवणार? याचे उत्तर सोपे नाही. त्यामुळेच शालेय शिक्षण मंत्री भोसे यांच्या सूचक वक्तव्याने पालकमंत्री पदाचा तिढा सुटला की नाही, याची नव्याने चर्चा सुरू झाली आहे

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT