Dada Bhuse & Eknath Shinde
Dada Bhuse & Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

दादा भुसेंनी What`s App ग्रुप बनवला, त्यात त्यांनाच शिव्या खाव्या लागल्या!

Sampat Devgire

मालेगाव : शिवसेनेतील (Shivsena) बंडखोर आमदारांवर आता चिकलफेक होऊ लागली आहे. कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या ग्रुपवर समर्थकांनी सगळ्या बंडखोरांची अक्षरशः चिरफाड केली. `आमदार घेऊन गेलेत, मतदार अजुनही शिवसेनेतच आहेत, हे विसरू नका` असा टोला खुद्द बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी लगावला. (Shivsena rebel MLA`s followers Criticised on there own whatsappGroup)

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जातो. राजकारण जसे जसे पुढे सरकत आहे, तसे हे आमदार नागरिक, समर्थक व शिवसेना कार्यकर्त्यांपासून लांब जाऊ लागले आहेत. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या स्वतःच्या ग्रुपवर व त्यांच्याच समर्थकांनी बंडखोरांची चिरफाड करीत अक्षरशः त्यांना लाखोली वाहिली आहे.

एक समर्थक म्हणतो, `मुख्यमंत्री आमदारांना वेळ देत नव्हते ही तक्रार आहे. या आमदारांनी तरी कुढे निवडून आल्यावर आम्हाला वेळ दिला` याच ग्रुपवर बंडखोर व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा व्हीडीओ अपलोड केला आहे. त्यात गुलाबराव म्हणतात, `मतलब के लिए लोग अपने बाप बदल देते है`. अन्य म्हणतात, `बाळासाहेबांची शिवसेना संपली, ही उद्धवजींची शिवसेना आहे असे म्हणणाऱ्यांनो ठाकरे आणि शिवसेना हे वेगळी करून तुम्ही चालवून दाखवा, बाळासाहेबांचा फोटो न लावता जगून दाखवा` असा टोमणा मारला आहे. या स्वरूपाच्या असंख्य पोस्टमधून बंडखोरांना ट्रोल केले जात आहे.

एक समर्थक म्हणतो, जेव्हा मातोश्रीवर चिखलफेक होत होती, तेव्हा एकटा संजय राऊत नडत होता. बाकीचे राजकीय दीड शहाणे स्वतःच्या करीअरचे पांढरे कपडे `सर्फ एक्सल`ने धुत होते. शिवसैनिक हे सगळं लक्षात ठेवणार. एकनाथ शिंदे यांचे स्विय सहाय्यक सचिन जोशी यांना १० दिवसांपूर्वी `इडी`ची नोटीस आली. तेव्हापासून ते गायब आहेत. त्याचा पाठपुरावा केला का? असे देखील म्हटले आहे.

बहुतांश बंडखोर आमदारांचा समाचार या ग्रुपमध्ये घेतला आहे. त्यात तानाजी सावंत हे तर ओरिजनल बंडखोर आहेत. अनिल बाबर हे ओरिजनल पक्ष बदलणारे असून राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आहेत. लता सोनवणे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध घोषित झाेलेले आहे. प्रताप सरनाईक व यामिनी जाधव यांच्या पतीच्या मागे इडी हात धुवून लागली आहे. संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर यांना पक्षाशी काहीही घेणे देणं नाही. अशी विविध बंडखोर आमदारांवर शेरेबाजी केली आहे. त्यासाठी जे शब्द वापरले आहेत, त्यांचा प्रयोग बातमीत शक्य नसल्याने अतिशय सौम्य शब्द वापरले आहेत.

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सत्तार!

एक समर्थकाने म्हटलेय, आमदार अब्दुल सत्तार हे शिवसेनेत येण्याआधी हिंदूंबाबत अपशब्द वापरत होते. आज ते हिंदुत्वासाठी शिंदे गटाला मिळाले आहेत. हाच एक विनोद आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT