एकनाथ शिंदेंचे बंड हे गृहमंत्री वळसे- पाटील यांचे अपयश?

राज्यात सत्ता असुनही राजकीय अस्थिरतेची पोलिसांच्या गोपनीय शाखा काय अहवाल देत होती?
Dilip Walse Patil- Eknath Shinde
Dilip Walse Patil- Eknath ShindeSarkarnama

नाशिक : सध्या राज्यात (Mahavikas Aghadi) राजकीय उलथापालथ सुरू आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एक एक आमदार पळवत होते, ते एका दिवसात घडलेले नाही. या आमदारांना पोलिसांचे (Police) संरक्षण असते. गोपनीय शाखा असते. स्वतःचेच सरकार अस्थिर होत असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) काय करत होते, असा प्रश्न जाणकारांना पडला आहे. (When each mla joining rebel group what Home minister doing) वळसे पाटलांना हे खरोखरीच माहिती नव्हते की त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एवढा मोठा राजकीय भूकंपाची पूर्वकल्पना न येणे, हे गृहखात्याचे अपयश आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनीही हे अपयश मान्य केले होते.

Dilip Walse Patil- Eknath Shinde
शिंदे गटाला पहिला झटका; बंडखोर आमदार योगेश कदम माघारी फिरण्याच्या वाटेवर

राज्य शासनाचे गृह खाते हे मुख्यमंत्र्यांखालोखाल सर्वात महत्वाचे खाते आहे. सबंध पोलिस यंत्रणा व त्यांचे विविध विभाग त्या अंतर्गत आहेत. या पोलिसांत एक गोपनीय शाखा आहे. या शाखेतील पोलिस कर्मचारी व अधिकारी सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवतात. त्याची सतत चाचपणी करत असतात. त्याचा अहवाल नियमितपणे वरिष्ठांना दिला जातो. या अहवालाच्या आधारे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना ब्रिफींग केले जाते. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांच्या मनात बंडाची कल्पना निश्चितच अचानक आलेली नसणार. त्याबाबत पोलिसांनी काहीच कसे कळले नाही, याची पोलिसांसह सर्व जाणकारांत दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

Dilip Walse Patil- Eknath Shinde
शिवसेनेने खेळला पहिला डाव : १६ बंडखोरांना नोटिसीची गुगली; टोलवणार की विकेट पडणार?

केंद्रीय संस्थांकडून महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचे, त्यांच्या पाठीराख्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सतत करीत होत्या. त्यामुळे गोपनाय शाखेचा या घडामोडी, त्यांच्या सांभाव्य कारवाया हे स्वतंत्र पोर्टफोलिओ बनतो. त्यावर नियमित काम व त्याचे मॅानिटरींग आवश्यक असते. तसे ते नक्कीच झाले असणार?. याबाबत राजकीय व पर्यायाने प्रशासकीय धोरण व कृती याचे नियोजन आवश्यक होते.

यासंदर्भात महाविकास आघाडीतील सर्वात महत्वाचे खाते सांभाळणारे गृहमंत्री वळसे पाटील यांनी ठरवले असते तर त्यावर निश्चित डॅमेज कंट्रोल करू शकले असते. जर महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल तर त्रास देणाऱ्यांना कंट्रोल करण्यासाठी रोज सरकारवर आरोप करणाऱ्यांसाठी गृह विभागाने काय धोरण आखले?. याची सगळ्यांना उत्सुकता आहे. तसे केले असते, तर कदाचित या बंडाचा फुग्याला कुठे तरी टाचणी टोचता आली असती. व सरकारवरचे संकट टळले असते, अशी चर्चा आहे.

राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर पोलिस सतर्कता बाळगून आहेत. कोणतीही कायदा सुव्यवस्थेची समस्या उद्‌भवू नये, यासाठी सर्व शहरात, काही राजकीय नेत्यांच्या निवास व कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्याच्या महाविकास आघाडीत सध्या कलहाचे वातावरण आहे. बंडखोर शिवसेना आमदार परराज्यात आहेत. परंतु, त्यांचे कुटुंबीय, निकटचे नेते, नातेवाईक यांच्याविरोधात संतप्त कार्यकर्त्यांकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे मुंबईपाठोपाठ राज्यातील काही शहरांमध्येही तणावाचे वातावरण आहे. अनेक शहरांमध्ये बंडखोरांच्या विरोधात वा समर्थनार्थ फलकबाजीही होऊ लागली आहे. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर सध्या पोलिसांचे बारीक लक्ष आहे. हे सर्व स्थिती घडण्या आणि बिघडण्यापूर्वी शक्य नव्हते का? ही कार्यकर्त्यांची भावना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com