Ajit Pawar & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse News : अजित पवार अस्वस्थ, काहीही होऊ शकतं!

बंदरे विकास मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा समाचार घेतला.

Sampat Devgire

Shivsena News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सध्या अस्वस्थ आहेत. त्यामुळे काहीही घडू शकते अशी राजकीय स्थिती आहे, असे राज्याचे बंदरे विकास मंत्री दादा भुसे म्हणाले. (Dada Bhuse said, Ajit Pawar is disturbed, anything can happen)

नाशिक (Nashik) जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आज येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (C.M. Eknath Shinde) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत ठाकरे यांच्यावर टिका केली.

आदित्य ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी विधान केले होते. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असे ते म्हणाले. याबाबत श्री. भुसे म्हणाले, आदित्य ठाकरे यांचा हा बलिशपणा आहे. त्यांना फार वर्षानंतर या गोष्टी आठवत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात जाऊन भारताच्या पंतप्रधानांविषयी काहीही विधाने करतात. दुसऱ्या देशात जाऊन काय वक्तव्य करावीत, याचे भान त्यांना राहात नाही. कारण ती राहुल गांधी यांची स्टाईल आहे. सध्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे छोटे युवराज त्यांचं अनुकरण करत असावेत. ते पुढे म्हणाले, सध्या महाविकास आघाडीचे नेते काहीही सांगत आहेत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. या काँग्रेसने राज्यातील सरकारचा धसका घेतला आहे.

उद्धव ठाकरे लवकरच पाचोरा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याबाबत राज्य सरकारच्या भूमिकेवर काही परिणाम होतो का? यावर ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे पाचोरा दौरा करणार आहेत. त्यानी यापूर्वी मालेगावचा दौरा देखील केला आहे. मात्र आमचा पक्ष शिवसेना कार्यकर्तच्यांच्या जीवावर मोठा झाला आहे. त्यांच्या बळावरच हा पक्ष उभा आहे. वातानुकुलीत कक्षात बसुन व एकमेकांच्या कानात कुजबुज करून पक्ष मोठा होत नाही. याची जाणीव एव्हाना त्यांनी झाली असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT