Dr. Rahul Aher news : आमदाराची कमाल एकाच अधिवेशनात मिळवले ८०० कोटी!

चांदवड-देवळ्यासाठी भरीव निधीची तरतूद झाली असुन नार-पार प्रकल्पास येत्या दोन महिन्यात प्रशासकीय मान्यता.
Dr. Rahul Aher
Dr. Rahul AherSarkarnama
Published on
Updated on

Chandwad-Deola constituency news : नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात चांदवड-देवळा मतदारसंघासाठी ८०८ कोटींच्या निधीची तरतूद झाली आहे. त्यामुळे रखडलेले महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागतील. रस्ते, पाणी, ग्रामविकास, इमारती, नगरपंचायत, पर्यटन अशा सर्वच घटकांच्या विकासासाठी निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. (Long time delayed Nar-Par irrigation project will may starts soon)

देवळा (Nashik) येथे पत्रकार परिषदेत आमदार आहेर (Dr. Rahul Aher) यांनी ही दिली. यावेळी भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष केदा आहेर (Keda Aher) उपस्थित होते. राज्य शासनाने (Maharashtra Government) नुकताच सादर केलेल्या अंर्थसंकल्पात (Budget) अनेक रखडलेल्या प्रकल्पांना निधीची तरतुद केली आहे. त्यातून महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील.

Dr. Rahul Aher
Chhagan Bhujbal news : भुजबळ यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले कडवे आव्हान!

डॉ. आहेर म्हणाले, की सटाणा-देवळा- मंगरूळ (राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी) या रस्त्याची सुधारणा करणेसाठी ४२८ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असल्याने या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. अर्थसंकल्पात पुणेगाव कालवा व दरसवाडी कालवा अस्तरीकरण करणे २४४ कोटी, पाझर तलाव व लघु पाटबंधारे तलाव दुरुस्ती करणे यांसाठीही १९ कोटी रुपये भरीव निधीस मंजूरी मिळाली आहे.

मतदारसंघातील ३९ तलाठी कार्यालय व सहा मंडळ अधिकारी कार्यालय बांधणीसाठी साडेसात कोटी, चांदवड शासकीय विश्रामगृह- अडीच कोटी, देवळा विश्रामगृह चार कोटी रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र वडाळीभोई साडेचार कोटी, शाळांच्या वर्गखोल्या-अंगणवाडी इमारत सहा कोटी तर प्रांत कार्यालय चांदवड व तहसील कार्यालय देवळा दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

नगरपंचायत चांदवड व देवळा येथे जलतरण तलाव, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, वाचनालय व अभ्यासिका बांधणे यासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच पर्यटन विभागासाठी सुद्धा विशेष विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

Dr. Rahul Aher
Dy. Collector Transfers : मध्यरात्री झाल्या ८२ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या!

चांदवड विधानसभा मतदारसंघात पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला असून काही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीही या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

नेत्यांना विश्‍वासात घेणार

देवळा बाजार समितीच्या निवडणुकीबाबत विचारले असता बाजार समिती कार्यक्षेत्रातील सर्व घटकांना व सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन सदर निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार असून ,त्यासंदर्भात रविवारी (ता.१६) इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊन विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही डॉ. आहेर व केदा आहेर यांनी सांगितले.

Dr. Rahul Aher
Rahul Gandhi Matoshri Visit: सर्वात मोठी बातमी! राहुल गांधी मातोश्रीवर येणार,ठाकरेंच्या राष्ट्रीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब?

दोन महिन्यात प्रशासकीय मान्यता

उत्तर महाराष्ट्राला नवसंजीवनी मिळणाऱ्या नार-पार प्रकल्पास पुढील दोन महिन्यात प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याने चांदवड व देवळा तालुक्यातील उच्च पातळी कालव्यांचा या प्रकल्प अहवालात समावेश व्हावा अशी आग्रही मागणी शासनाकडे केली असल्याची डॉ. आहेर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com