Dada Bhuse & Devyani Pharande
Dada Bhuse & Devyani Pharande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse: एकनाथ शिंदे यांनी दादा भुसेंना दिले मैत्रीचे गिफ्ट!

Sampat Devgire

नाशिक : उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या मंत्रीमंडळात नाशिकचे (Nashik) दादा भुसे (Dada Bhuse) हे कृषीमंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिकचे पालकमंत्री होते. हे दोन मंत्री असल्याने आज होत असलेल्या मंत्री मंडळात बंडखोर गट व भाजप यांचा समतोल साधत दादा भुसे यांना पुन्ही संधी मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी मैत्रीचे गिफ्ट त्यांना मिळाले आहे. भाजपतर्फे (BJP) देवयानी फरांदे (devyani Pharande) यांचे नाव घेतले जात आहे. (Nashik will likely to get two minister in new Government)

भाजपकडून राज्याच्या मंत्रीमंडळात (कै) दौलतराव आहेर आणि (कै) ए. टी. पवार यांच्यानंतर देवयानी फरांदे या भाजपच्या मंत्री होत आहेत. त्या नाशिक मध्य मतदारसंघातूव दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यामुळे मंत्रीपदासाठी त्यांच्या समर्थकांसह सौ. फरांदे प्रयत्नशील होत्या. यानिमित्ताने त्यांच्या समर्थकांना गुलाल उधळण्याची संधी मिळू शकते.

जिल्ह्यातून भुसेंचे पारडे जड

नाशिक जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खंदे समर्थक आणि आमदार दादा भुसे यांना मंत्रिपद नक्की असल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी त्यांचे निकटचे, मैत्रिपूर्ण संबंध आहेत. श्री. भुसे कट्टर शिवसैनिक असले, तरी त्यांनी शिवसेनेवर कोणतीही टीका न करता शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

श्री. भुसे सलग चौथ्यांदा आमदार तसेच मंत्रिपदाचा दीर्घ अनुभव यामुळे त्यांचे मंत्रिपद निश्‍चित मानले जात आहे. श्री. शिंदे यांच्याबरोबर असलेले नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्याही नावाची चर्चा आहे. माजी मंत्री छगन भुजबळांना थेट विरोध करणारे आणि शिंदे यांच्या मर्जीतले म्हणून कांदे ओळखले जातात. त्यांना राज्यमंत्रिपद किंवा पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT