जळगाव : राज्य (Maharashtra) मंत्रिमंडळाच्या आजच्या विस्तारात खानदेशातून अनेक हेवीवेट नेते मंत्रीपदाची लॅाबिंग करीत आहेत. त्यात मावळत्या मंत्रीमंडळातील सदस्य देखील आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सामील झालेल्या काही आमदारांची निराशा होण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन, (Girish Mahajan) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे नाव निश्चित असल्याचे बोलले जाते. (Rebel MLAs have big expectation in expantion)
जळगाव जिल्ह्यातून भाजपतर्फे आमदार गिरीश महाजन, तर शिंदे गटातर्फे माजी मंत्री गुलाबराव पाटील व पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यातून भाजपतर्फे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल आणि शिंदे गटातर्फे आमदार मंजुळा गावित यांना, तर नंदुरबार जिल्ह्यातून माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सकाळी नऊला मुंबईत सह्याद्री बंगल्यावर उपस्थित राहण्याबाबत शिंदे गटातील आमदारांना दूरध्वनी आले आहेत.
मंत्रिमंडळाचा लांबलेला विस्तार मंगळवारी होत असून, सकाळी अकराला शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. खानदेशात शिंदे गट व भाजपकडून कोणाची वर्णी लागणार आहे याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव निश्चित असल्याचे मानले जाते. ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही ते विश्वासातील मानले जातात, त्यामुळे त्यांची संधी नक्की आहे. श्री. महाजन सध्या मुंबईतच आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही.
शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे जळगाव जिल्ह्यातून दोन मंत्रिपदे देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मंत्रिपदाचा त्याग करून गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद निश्चित असल्याचे मानले जात आहे. पाटील सद्यःस्थितीत मुंबईतच आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याला सकाळी नऊला सह्याद्री बंगल्यावर बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आपणास मंत्रिपदाबाबत काहीही कळविलेले नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
गुलाबराव पाटील शिवसेना-भाजप युतीमध्ये सहकार राज्यमंत्री होते, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री होते. विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावावेळी त्यांनी शिंदे गटाची बाजू आक्रमकपणे मांडून आपली छाप निर्माण केली होती. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांचे स्थान निश्चित मानले जात आहे.
किशोर पाटलांना संधी मिळेल?
पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात शिंदे गटाकडून राज्यमंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. किशोर पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटचे मानले जात आहेत. राज्याचे नगरविकासमंत्री असताना शिंदे यांनी अचानक जळगाव जिल्हा दौरा करून पाचोरा येथे भेट दिली होती. या दौऱ्यात शिंदे यांनी पाचोऱ्यातील एका देवस्थानाला भेट देऊन दर्शन घेतले होते. त्या वेळी आमदार किशोर पाटील उपस्थित होते.
यानंतर त्याची खूप चर्चा झाली होती. कालांतराने राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले, त्या वेळी किशोर पाटील त्यांच्यासमवेत होते. राजकीय घडमोडींनंतर शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली, याचे रहस्य शिंदेंच्या पाचोरा भेटीत असल्याची चर्चा आहे, त्यामुळे किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की आपल्याला सकाळी नऊला सह्याद्री अतिथिगृहावर उपस्थित राहण्याबाबत फोन आला आहे. मात्र मंत्रिपदाबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही, मात्र आपल्याला संधी मिळण्याची अपेक्षा आहे, ते मिळाल्यास आपण विश्वास सार्थ करून दाखवू.
-----------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.