Dada Bhuse News: गेले महिनाभर नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची सगळेच वाट पहात आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदी नियुक्ती होताच ही स्थगिती आली होती. आता नवे पालकमंत्री कोण याची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाची बैठक गेली अनेक दिवस प्रलंबित होती. मंगळवारी ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑनलाइन उपस्थितीत झाली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांसह जिल्ह्यातील विविध मंत्री उपस्थित होते. मात्र ही बैठक वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिली.
ये बैठकीत विविध विकासकामांसह प्रामुख्याने जिल्हा वार्षिक नियोजन आणि आराखडा याबाबत चर्चा झाली. त्याला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी त्यासाठी लागणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दादा भुसे यांची फिरकी घेतली.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जिल्ह्याला पालकमंत्री नाही. जिल्हा परिषदेची समिती नाही. त्यामुळे तुम्ही ठराव पाठवून द्या, पुढे आपण पाहून घेऊ अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्री भुसे यांची फिरकी घेतली. यामुळे बैठकीत एकच खसखस पिकली
त्यानंतर बैठक सुरू असतानाच जिल्हाधिकाऱ्यांच्या शेजारी शिरस्त्याने पालकमंत्री बसतात. त्या खुर्चीवर भुसे बसले होते. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अहो तुम्ही पालकमंत्र्यांच्या आसनावर बसला आहात, असा चिमटा घेतला. त्यावर भुसे यांनी देखील फारसे गंभीर न होता, मला त्या बाजूने ऐकायला येत नाही, असे सांगत तो चेंडू महाजन यांच्याकडे परतवला.
नाशिक आणि रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाही. या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीवरून भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. या स्पर्धेमुळे या नियुक्त्या रखडल्या आहेत. जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे त्याची राजकीय चर्चा सुरू आहे. त्याला जिल्हा नियोजन मंडळाचे पुन्हा एकदा निमित्त ठरले.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.