Mahayuti Politics; Dada Bhuse, Narhari Zirwal and Sameer Bhujbal And Girish Mahajan sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahayuti Politics : भाजपच्या मास्टरस्ट्रोकने मित्र पक्षांची धडधड वाढली, दादा भुसे, झिरवाळ अन् भुजबळांकडून हालचालींना वेग

Mahayuti Dispute News : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र भाजपने महायुतीच्या जागा वाटपाला दुर्लक्षित केले आहे. भाजप इनकमिंग करण्यात व्यस्त झाला आहे.

Sampat Devgire

  1. भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असून त्यामुळे उमेदवारी देताना नेतृत्वास मोठे आव्हान आहे.

  2. भाजप स्वबळावर महापालिका निवडणुका लढवण्याच्या भूमिकेमुळे शिवसेना व राष्ट्रवादीची धावपळ सुरू आहे.

  3. भुजबळ फार्मवर झालेल्या गुप्त चर्चांनी महायुतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Nashik News : नाशिक शहरात महायुती होणार की नाही? ही चर्चा शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांची धडधड वाढवत आहे. नाशिकनंतर मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा झाली. मात्र भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांनी ठोस प्रस्ताव दिला नाही, असे कळते.

भाजपमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावरही जोरदार इन्कमिंग सुरू आहे. त्यामुळे इच्छुकांच्या प्रचंड संख्ये पुढे नेत्यांची उमेदवारी देताना दमछाक होणार आहे. त्यामुळे भाजपची स्वबळावर निवडणुकीची चर्चा जोरात आहे. भाजपच्या या भूमिकेने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची चांगलीच धावपळ होत आहे. या पक्षाने किमान नऊ जागांवर समाधान मानण्याची मानसिकता केली होती.

मात्र त्यालाही मूर्त स्वरूप आलेले नाही. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची अवस्था त्याहूनही अधिक अवघड झाली आहे. पक्षाने प्रारंभी 65 जागांचा प्रस्ताव दिला होता. तो 45 वर आला तरीही भाजपकडून प्रतिसाद येत नसल्याने त्यात आणखी घट झालीय.

आता महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सावध झालेल्या शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने पर्यायी तयारी सुरू केली आहे. या पक्षांनी आप सात युती करण्याचा फॉर्मुला पुढे केला आहे.

या संदर्भात शनिवारी भुजबळ फार्म हे महापालिका निवडणुकीच्या राजकारणाचे केंद्र झाले होते. शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांसह काही प्रमुख नेत्यांची सायंकाळ पासून उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. यामध्ये दोन्ही पक्षांनी शंभर जागांवर उमेदवारी द्यावेत. 22 जागांवर वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांना जागा देण्याची चर्चा झाल्याचे कळते.

आता भाजप स्वबळावर महापालिका निवडणुकीत 100 प्लस साठी लढणार आहे. या धोरणात काही बदल झाल्यास महायुतीचा प्रयत्न होईल. यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला प्राधान्य असणार अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष याबाबत काय भूमिका घेतो, याची उत्सुकता आहे.

FAQs :

1) भाजप स्वबळावर महापालिका निवडणूक लढवणार का?
👉 सध्या चर्चा जोरात असून अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही.

2) भाजपच्या या भूमिकेचा कोणाला फटका बसू शकतो?
👉 शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सर्वाधिक दबाव येऊ शकतो.

3) भुजबळ फार्मवरील बैठक का महत्त्वाची ठरते?
👉 कारण तिथे महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वाची रणनीती ठरवली जात असल्याचे संकेत आहेत.

4) भाजपमध्ये ‘इन्कमिंग’ म्हणजे काय?
👉 इतर पक्षांतील नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

5) या घडामोडींचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल?
👉 महायुतीतील जागावाटप व युतीची दिशा बदलू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT